‘हिंदसेवा’च्या संस्थापकास भरदिवसा मारहाण

बेगसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Nagar Crime News
मारहाणfile photo
Published on
Updated on

हिंदसेवा मंडळाचे सहसचिव व श्रीराम तरूण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांना काल चौघांनी त्यांच्या मेनरोडवरील त्यांच्या दुकानात शिरून लाकडी दांडक्याने मारहाण केली. उपाध्ये यात जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी सागर बेगसह चौघांविरूद्ध खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ घटनेनंतर तातडीने श्रीरामपूर बंद करण्यात येवून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अशोक उपाध्ये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 28 डिसेंबर 2024 रोजी आमदार हेमंत ओगले यांच्या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी उपाध्ये यांनी भाषण केले होते. या भाषणामध्ये कुणाचेही नाव न घेता सामाजिक परिस्थितीवर आधारीत भाषण केले होते. त्याचा राग मनात धरून काल दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मेनरोडवरील पवन किराणा अ‍ॅण्ड ड्रायफूट या दुकानात नेहमीप्रमाणे बसलेले होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी त्यांना दुकानात शिरून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्या दिवशी भाषणात तुम्ही खूप बोललात. सागर बेगच्या विरोधात बोलता, तुम्हाल दुकान चालवयाचे आहे का? असे धमकावले. त्यातील एकाने सागर बेग याला फोन लावला. स्पीकरवर टाकला. दुकान चालवायचे असेल तर 10 हजार रुपये दे. अशी मागणी केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी तसेच सोबत आणलेल्या लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. उपाध्ये यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र मारहाण करून हल्लेखोर काही मिनीटात पसार झाले. याप्रकरणी उपाध्ये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी सागर बेगसह चार अज्ञात इसमांविरूद्ध खंडणीची मागणी करणे व जबर मारहाण करणे, या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल मंगळवारी ऐन संक्रातीच्या सणाच्या दिवशी शहरातील मेन रोड परिसरात झालेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळतात पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत झालेली गर्दी पांगवून उपाध्ये यांचे विचारपूस केली. यावेळी मुख्य रस्त्यावरील ध्रुवी लाईफस्टाईलसमोर मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली.

आमदार ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, प्रकाश चित्ते, बाबासाहेब शिंदे, अशोक थोरे, अहमद जागीरदार, सलीम पठाण, शिवसेना नेते संजय छल्लारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, ज्येष्ठ नेते नाना पाटील, काँग्रेस नेते सचिन गुजर, संदीप मगर, राष्ट्रवादीचे नेते लकी शेठी यांनी सदर हल्ल्याचा निषेध केला. याप्रसंगी संजय यादव, चरण त्रिभुवन, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, काँग्रेस नेते ज्ञानेश्वर मुरकुटे, यांनी देखील मागील काही दिवसांपर्वी आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रसंग पोलिस व नागरिकांसमोर कथन केला तसेच गुंडा प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली.यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, कामगार नेते जीवन सुरूडे आदी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

दुकाने बंद ठेवून केला निषेध

अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही वेळातच आसपासची सर्व दुकाने बंद झाली. या गुंडगीरीच्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी आ. हेमंत ओगले, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, भाजपाचे प्रकाश चित्ते, मनसेचे बाबा शिंदे, सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड व अनेक कार्यकर्त्यांनी शहरातील व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनेनंतर काही वेळातच व्यापारी व राजकीय पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक यांनी शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली

माजी आमदार कांबळेंवरील हल्ल्याची आठवण

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील निवडणूक काळात आपल्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेला उजाळा देत शहर व तालुका वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news