माध्यमिक सोसायटीसाठी जोरदार लॉबिंग

शिष्टमंडळे अ‍ॅक्टिव्ह, बैठकांनाही वेग; उद्या चित्र होणार स्पष्ट
nagar
माध्यमिक शिक्षक सोसायटीpudhari
Published on
Updated on

नगर : माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चित्र मंगळवारी (उद्या) स्पष्ट होणार आहे. दोन्ही मंडळांकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीसाठी शिष्टमंडळे, ‘सोधा’ची फिल्डींग व बैठकांना जोर आला आहे. मात्र श्रेष्ठींच्या ‘सक्षम’ उमेदवारालाच संधी देण्याच्या मानसिकतेत असल्याने उद्या नेमका कोणाचा पत्ता कट व कोणाची लॉटरी लागणार? याकडे लक्ष असणार आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक सोसायटीचे राजकारण हे नेहमीच प्रतिष्ठेचे ठरलेले आहे. संस्था आणि निवडणूक ही नेहमीच प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्याभोवतालीच फिरताना दिसली. आजही विरोधकांनी कचरे हेच लक्ष्य करताना मनमानी आणि आर्थिक कारभारवर बोट ठेवले. तर सत्ताधारी गटातून कचरे यांनी अजुनही मौन सोडलेले नसल्याने सभासदही संभ्रमात आहेत. दरम्यान, संस्थेच्या 21 जागांसाठी 242 इच्छुकांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत. यामध्ये सत्ताधारी गटातून इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे साहजिकच उमेदवारी अंतिम करताना कचरे यांच्या डोक्याला मोठा ताप होणार आहे. यातून बंडखोरीही वाढण्याची चर्चा आहे, सत्ताधार्‍यांत बंड होऊन काही अपक्षही रिंगणात उतरणार का, याकडे लक्ष असणार आहे. तसेच यावेळी माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेत्तर संघटना, शिक्षक भारती, शिक्षक परिषद, मागासवर्गीय शिक्षक संघटना, प्रामुख्याने जुनी पेन्शन योजनेवर काम करणारे शिक्षक नेत्यांची विरोधकांनी मोट बांधली आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांना ही निवडणूक जड जाणार हे स्पष्टपणे दिसत आहे.

दुसरीकडे सत्ताधार्‍यांना सत्तेतून खेचण्यासाठी राजेंद्र लांडे, सुनील पंडीत, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे हे दिग्गज एकत्र आले आहेत. या गटात एक-दोन सत्ताधारी संचालकही डेरेदाखल झाले असून, काही येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे इकडेही विजयाचे गणित सोपे वाटत असल्याने इच्छुक तितकेच उत्सूक आहेत. त्यामुळे कोणाला थांबवायचे, याबाबतही श्रेष्ठींना नाराजी ओढावून घ्यावी लागणार आहे. याशिवाय 21 जागांमध्ये उद्याच्या राजकीय समिकरणांचा विचार करताना लांडे, पंडीत, शिंदे आदी नेतेमंडळी आपल्या किती निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवार घेण्यात यशस्वी होतात, याकडेही लक्ष असणार आहे.

दरम्यान, उद्या मंगळवारी अर्ज माघारीची शेवटची मुदत आहे. त्यामुळे कोणाचा अर्ज अंतिम करायचा याबाबत खलबते सुरू झाली आहेत. शिष्टमंडळे आणली जात आहे, हॉटेलमध्येही बैठका वाढल्याचे कानावर येत आहे, अंतर्गत विरोधकांचे पत्ते कापले जाण्यासाठीही छुपे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे उमेदवारीची ही स्पर्धा टोकाला जाताना दिसत आहे. 12 मार्चला चिन्हे वाटप तर 23 मार्चला मतदान आणि 24 ला मतमोजणी होणार आहे.

पुरोगामी मंडळाची चर्चेतील नावे

राहुरी ः अशोक काळे, गणेश म्हसे, सुरेश भुजाडी, प्रकाश राजुळे, रावसाहेब कदम, नंदकुमार दिघे, नेवासा ः सोपान काळे, शेवगाव ः संजय चेमटे, संजय भुसारी, पाथर्डी ः सुरेश मिसाळ, महेंद राजगुरु, श्रीनाथ वेताळ, नगर/शहरः धनंजय म्हस्के, माधुरी एकसिंघे, आशा कराळे, मनिषा जावळे, सुनीता पाठक, मनीषा मगर, श्रीगोंदाः बापू गायकवाड, अशोक आळेकर, कर्जतः आशिष काळदाते, उत्तमराव जगताप, पारनेर ः बाबासाहेब दाते, संजय बरवे, संगमनेर ः चांगदेव खेमनर, बाळासाहेब जाधव, संजय वाळे, सचिन फटांगरे, राहुल बोरुडे, अकोलेः केरू आभाळे, आण्णासाहेब ढगे, जिजाबा हासे, सुनील धुमाळ, भास्कर कानवडे, कोपरगाव राहाताः वाल्मिक काकडे, सुनील आढाव, श्रीरामपूरः सुनील शिंदे, औताडे. जाकीर सय्यद

स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे दावेदार

राहुरी ः आप्पासाहेब शिंदे, प्रकाश मोढे, संभाजी गाडे, राजू जाधव. नेवासा ः सुनील दानवे, ÷उद्धव सोनवणे, शेवगावः संतोष झाडे, मुकूंद आंचवले, पाथर्डीः अंबादास राजळे, शिवाजी लवांडे, कानवडे. नगर ः महेंद्र हिंगे, दत्तात्रय नारळे, राजू कोतकर, बाबासाहेब बोडखे, मुळे, श्रीगोंदा ः आप्पासाहेब जगताप, सुनील भोर, कर्जतः बाजीराव अनभुले, पारनेरः राहुल झावरे, संगमनेर ः अर्जून वाळके, गुंजाळ, अकोले ः किशोर धुमाळ, कानवडे, कोपरराव राहाता ः अतुल कोताडे, सचिन जाधव, श्रीरामपूर ः साहेबराव रक्टे,

पुन्हा कोणा-कोणाला मिळणार संधी?

विद्यमान संचालकांमध्ये धनंजय म्हस्के, आशा कराळे, मनीषा जावळे, सुरेश मिसाळ, चांगदेव खेमनर, आण्णासाहेब ढगे, भास्कर कानवडे, अशोक आळेकर, दिलीप काटे, कल्याण ठोंबरे, केशव गुंजाळ, मनीषा खिलारी यातील काही रिपीट होणार तर काहींना थांबावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news