ST Smart Card Mandatory: ‘स्मार्टकार्ड’ नाही? मग सवलतही नाही! एसटीच्या नव्या नियमामुळे पहिल्याच दिवशी प्रवाशांना भुर्दंड

अहिल्यानगर जिल्ह्यात ७.६१ लाखांनी नोंदणी; कार्ड नसल्याने अनेक सवलतीधारकांना पूर्ण तिकीट
Smart Card
Smart CardPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: एसटी महामंडळाने गुरुवारपासून (दि.१) सवलतीधारक प्रवाशांसाठी स्‍मार्टकार्ड (एनसीएमसी) बंधनकारक केल्‍याने प्रवाशांचे धाबे दणाणले. स्‍मार्टकार्डच काढले नसल्‍याने जवळपास ७५ टक्‍के प्रवाशांना पहिल्‍याच दिवशी पूर्ण प्रवास भाड्‍याचा भूर्दंड सहन करावा लागला.

बहुतांश बसमध्‍ये स्‍मार्टकार्डच्‍या सक्‍तीवरुन वाहक आणि महिला प्रवाशांमध्‍ये शाब्‍दिक चकमकी उडाल्‍या. आता स्‍मार्टकार्डशिवाय सवलत नाही हे ग्रहीत धरुन स्‍मार्टकार्ड नोंदणीसाठी आता बसस्‍थानकांवर गर्दी उसळणार आहे.

Smart Card
Palshi ST Bus Service: पळशी गावाचा एसटीशी संपर्क तुटला; नियमित बससेवेसाठी ग्रामस्थ आक्रमक

महामंडळाच्‍या वतीने अमृत ज्‍येष्‍ठ नागरिक, ज्‍येष्‍ठ नागरिक तसेच महिलांना प्रवासभाड्यात सवलत लागू आहे. या सवलतीच्‍या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नव्‍याने एनसीएमसी स्‍मार्टकार्ड ही प्रणाली लागू करत ते सक्‍तीचे करण्‍यात आले.

१९ फेब्रुवारी २०२६ पासून स्‍मार्टकार्ड नोंदणीस प्रारंभ झाला. या नोंदणीसाठी जिल्‍हाभरातील प्रत्‍येक बसस्‍थानकांवर व्‍यवस्‍था केली. स्‍मार्टकार्ड सक्‍तीचे केल्‍याने महिला, दिव्‍यांग तसेच ज्‍येष्‍ठ नागरिकांची गेल्‍या आठ महिन्‍यांपासून कार्ड काढण्‍यासाठी धावपळ सुरु आहे. अद्याप बहुतांश सवलतीधारक नोंदणीकडे फिरकले नाहीत.

स्‍मार्टकार्ड असेल आणि त्‍यामध्‍ये प्रवासभाड्याएवढी रक्‍कम असेल तरच सवलतीचा लाभ घेता येईंल अन्‍यथा पूर्ण प्रवासभाडे आकारले जाईल असा इशारा सवलतीधारक प्रवाशांना दिला होता. त्‍यानुसार महामंडळाने गुरुवारपासून (दि.१) स्‍मार्टकार्डधारकांनाच सवलत देण्‍यास प्रारंभ केला.

Smart Card
Kopargaon Drought: कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त; नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू

पहिल्‍याच दिवशी बसमध्‍ये सवलतीचा फायदा घेणार्‍या प्रवाशांकडे स्‍मार्टकार्ड व नोंदणी केल्‍याचे पावती नव्‍हती. त्‍यामुळे वाहकांनी पूर्ण तिकिटांच्‍या रकमेची मागणी करताच महिला आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांनी हुज्‍जत घालण्‍यास प्रारंभ केला.

आता आधारकार्ड चालणार नाही. स्‍मार्टकार्ड आणि त्‍यामध्‍ये प्रवासभाड्याइतके पैसे असेल तरच सवलतीच्‍या दरात प्रवास करता येईल, असे सांगत वाहकांनी महिला आणि ज्‍येष्‍ठ नागरिकांचा पारा कमी केला. त्‍यामुळे नाईलाजास्‍तव प्रवाशांना प्रवासाचे पूर्ण भाडे अदा करावे लागले आहे.

जिल्ह्यात ७.६१ लाख स्‍मार्टकार्डधारक

एसटी प्रवास भाड्यात सवलत घेणार्‍यांना स्‍मार्टकार्ड देण्‍याच्‍या निर्णयानंतर १९ फेब्रुवारीपासून स्‍मार्टकार्ड नोंदणीस प्रारंभ झाला. गेल्‍या सात महिन्‍यांत जिल्ह्यातील ७ लाख ६१ हजार जणांनी नोंदणी केली असून, ६ लाख ८ हजार कार्डांचे वितरणही झालेले आहे. महामंडळाने सक्‍तीने अंमलबजावणी केल्‍याने आता नोंदणीसाठी झुंबड उडणार आहे.

क्यूआरकोड पावतीव्‍दारे सवलत

स्‍मार्टकार्डची नोंदणी केल्‍यानंतर महिनाभरात स्‍मार्टकार्ड उपलब्‍ध होत आहे. नोंदणी केली मात्र, स्‍मार्टकार्ड उपलब्‍ध झालेले नाही अशा प्रवाशांना नोंदणीवेळी मिळालेल्‍या क्यूआर (QR) कोड पावतीव्‍दारे ३० दिवसांपर्यंत सवलतीत प्रवास करता येणार असल्‍याने महामंडळाने म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news