

श्रीरामपूरः 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनच्या वतीने शहरातील गोंधवणी परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. गावठी हातभट्टी दारुसह दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 89 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवर नष्ट केला.
याप्रकरणी दिलीप नाना फुलारे, मधुकर पिरा गायकवाड, आकाश गोरख गायकवाड, मंगल अर्जुन गायकवाड व मिना शाम पवार यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 19 हजार 300 रुपयांची 193 लिटर गावठी हातभट्टी तयार दारु 100 रुपये प्रती लिटरप्रमाणे तसेच 1 लाख 70 हजार 80 रुपयांचे 2126 लिटर कच्चे रसायन, 20 प्लॅस्टीक बॅरल असा एकूण 1 लाख 89 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवर नष्ट केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाक्चौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक रोशन निकम व आप्पासाहेब हंडाळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकडे व सचिन दुकळे यांनी यशस्वी केली. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार करीत आहे.