Shirdi Defence Project: शिर्डीत देशातील सर्वांत मोठ्या खासगी डिफेन्स प्रकल्पाची पाहणी

राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची संयुक्त भेट; क्षेपणास्त्र, ड्रोन आणि दारूगोळा निर्मितीला चालना
Shirdi Defence Project
Shirdi Defence ProjectPudhari
Published on
Updated on

एकरुखे: शिर्डी येथे उभारलेल्या देशातील सर्वांत मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली. या वेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Shirdi Defence Project
Shabdagandh Sahitya Sammelan: साहित्यिक, पत्रकारांनी जागल्याची भूमिका पार पाडावी: प्रा. डॉ. संदीप सांगळे

शिर्डीतील या डिफेन्स क्लस्टरमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारूगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

Shirdi Defence Project
Nevasa missing persons cases: नेवाशात चार महिन्यांत 75 जण बेपत्ता, 25 आत्महत्या; महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक

या प्रकल्पामुळे ‌‘मेक इन इंडिया‌’ आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला बळ मिळणार असून भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.

साईसमाधी दर्शन

संरक्षणमंत्री राजनाथसिंह व मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news