Ashok Kharat: शिर्डी विमानतळ जमीन घोटाळा: भोंदू खरातच्या आर्थिक काळेबेरेचा मोठा पर्दाफाश

कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार, बनावट खाती आणि ब्लॅक मनीचा वापर समोर; पोलिसांचा तपास अधिक तीव्र
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case Pudhari
Published on
Updated on

नगर: काकडीतील शिर्डी विमानतळ उभारणीनंतर तेथील जमिनीला सोन्याचे भाव आले; पण भोंदू खरातला त्यातही लखलाभ झाल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर येत आहे. विमानतळानजीक 4 एकर जमीन या भोंदूने अवघ्या सव्वा कोटीत विकत घेतलीच कशी? असा प्रश्न पोलिसांनाही पडला असून, त्यात ‌‘ब्लॅक मनी‌’ वापराचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. समता पतसंस्थेत स्वत: नॉमिनी असणाऱ्या खरातने भाचे प्रदीप व नितीन पाकळे नावाच्या भाच्यांनाही गंडविले. राजकीय कनेक्शनने चर्चेतील दीपक लोंढेच्या नावाने समता पतसंस्थेत दोन खाती असून त्यातही अडीच कोटींचे व्यवहार झाल्याचे समोर येत आहे.

Ashok Kharat Case
Rahuri Bypoll Election Training: राहुरी पोटनिवडणूक 2026: 1834 कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम प्रशिक्षण पूर्ण

लैंगिक शोषणाचा भांडाफोड करत खरातचा ‌‘बंदोबस्त‌’ करणाऱ्या शिर्डी पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहाराचे काळेबेरे समोर आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. याच तपासात भोंदू खरात नॉमिनी असलेल्या समता पतसंस्थेतील 100 खाती डिटेक्ट झाली. त्या खातेदारांची चौकशी केल्यानंतर खरातचे काळे धंदे समोर आले. देवदर्शनाच्या नावाखाली भक्तांचे पॅन, आधार कार्ड घेत भोंदू खरातनेच ते खाते उघडले. त्यातून कोट्यवधींचे व्यवहार केले, मात्र त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे जबाब समतातील ‌‘त्या‌’ खातेदारांनी दिले आहे. राजकीय निकटवर्तीय असलेले दीपक लोंढे दाम्पत्याच्या नावेही समतात दोन खाती असून त्यातून 2 कोटी 40 लाखाचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. नितीन व प्रदीप पोकळे यांच्या समतामधील खात्यातून 2 कोटी 40 लाखांचे व्यवहार झाल्याचे समोर आले. मात्र हे खाते आपले नसल्याचा जबाब पोकळे बंधू आणि लोंढेंनी दिल्याचे समजते.

Ashok Kharat Case
Taklibhan Atrocity Case: टाकळीभानमध्ये आंबेडकर जयंतीपूर्वी वाद; ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

शिर्डीत 50 कोटींची चार एकर जमीन अवघ्या पाच कोटींना हडपणाऱ्या भोंदू खरातचा आणखी एक कारनामा पोलिसांच्या रडारवर आला आहे. काकडी विमानतळानजीकच्या जमिनीला सोन्याचे मोल असतानाही खरातला 4 एकर जमीन अवघ्या सव्वा कोटींना कशी मिळाली? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या व्यवहारात खरातने ब्लॅक मनी व्हाईट केल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास सुरू झाला आहे. या जमिनीच्या खरेदी व्यवहाराचा दस्त मागवून घेत पोलिसांनी मूळ मालक, मध्यस्थी असणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

Ashok Kharat Case
ST Bus Fare Hike: अहिल्यानगरमध्ये एसटी भाडेवाढ; उन्हाळ्यात प्रवासासाठी अधिक खर्च

अरविंद बावके करत होता खरातचे खाते ऑपरेट?

शिर्डीतील जमीन खरेदीत भोंदू खरातसोबत असलेला अरविंद बावकेही फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. न्यायालयीन कोठडीतील बावकेसंदर्भात पोलिसांना बुधवारी नवीनच माहिती हाती लागली. खरात नॉमिनी असलेल्या पतसंस्था, बँक खात्यात पैसे टाकणे, काढणे असे व्यवहार बावके करत असल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Ashok Kharat Case
Ashok Kharat: भोंदू अशोक खरात प्रकरणात 3 कोटींचा व्यवहार; शेवगावसह सहा जणांना समन्स

शेवगावातील चौघांची चौकशीला दांडी

खरातच्या खात्यात सुमारे तीन कोटींच्या आसपास डिपॉझिट करणाऱ्या शेवगावच्या चौघांना चौकशीसाठी बुधवारी बोलावले होते. पण या चौघांनी पोलिसांच्या चौकशीकडे पाठ फिरवली. दरम्यान, नाशिकच्या देशमुख यांनी भोंदू खरातला 25 लाख रुपये उसने दिले. ते खरातने परत केल्याचे सांगत तसे पुरावेही सादर केल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news