Ahilyanagar : ‘आम्हाला पाहून सभापती, संचालक बैठकीतून पळाले’; विखे गटाची तक्रार

विखे गटाच्या संचालकांची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार
Ahilyanagar
श्रीरामपूर बाजार समितीpudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर : श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती व प्रभारी सचिव सर्व बेकायदेशीर गोष्टी करत आहेत. त्याला आमचा विरोध असल्यामुळे कालच्या बैठकीला आम्ही वेळेच्या अगोदर येऊनहीं सत्ताधारी संचालक आम्हाला पाहून पळून गेले. आमच्या विरोधाची इतिवृत्तवर सह्या करू दिल्या नसल्याने तसेच विषय क्रमांक 7 व 8 या विषयाला आमचा विरोध असल्याने याबाबतचा आमचा अर्ज स्वीकारला नसल्याने याबाबतची तक्रार जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक उपनिबंधक यांच्याकडे केली असल्याची माहिती बाजार समितीचे विरोधी विखे गटाचे पाच संचालकानी केली असल्याची माहिती उपसभापती अभिषेक खंडागळे, नाना पवार, यांनी दिली आहे.

याबाबत तक्रार अर्जात असे म्हटले आहे की, शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली मासिक बैठक तहकूब करण्यात आली असल्यामुळे ती बैठक काल मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ससाणे व मुरकुटे गटाचे संचालक उपस्थित होते. आम्ही वेळेच्या आधी या बैठकीला येऊनही आम्हाला पाहून सगळ्यानी त्या ठिकाणाहून पळ काढला. आम्हाला मागील मासिक सभेच्या विषयपत्रिकेवर विषय क्र-7 हा श्रीरामपूर मुख्य आवारातील कांदा मार्केटमधील पूर्व पश्चिम रोडचे कॉक्रेटीकरणाचे फायनल बिलाबाबत विचार करणे. व विषय क्र-8 हा बेलापूर उपबाजार भुसार आवारातील रोड कॉक्रेटीकरणाचे फायनल बिलाबाबत विचार करणे याबाबत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत संस्थेच्या मुख्य बाजार आवार, बेलापूर उपबाजार व टाकळीभान उपबाजार येथे विविध कामे करण्यात येत आहे, हि कामे नियमबाह्य आहे व निकृष्ट दर्जाची आहेत. या कामांची निविदा विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याच्या एक दिवसआधी प्रसिद्ध करण्यात आली. निविदा प्रसिध्द करताना शासनाची नियमावली डावलण्यात आली. या कामांना मंजुरी देताना पणन संचालक यानी अटी व शर्ती घालून दिलेल्या होत्या परंतु संस्थेने या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. सदर कामाच्या निविदा अंतिम करण्यापूर्वी पणन संचालकांची पूर्व मान्यता घेण्यात आलेली नाही.

स्थानिक सक्षम अधिकारी यांच्या परवानगी शिवाय बांधकाम सुरु करू नये असे अटी शर्ती मध्ये नमूद असतांना देखील स्थानिक सक्षम अधिकार्‍यांची परवानगी न घेता कामे सुरु करण्यात आली. ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत व अद्याप हि कामे पूर्ण नसताना अंतिम बिल अदा करण्यात आले आहे.

या सर्व बेकायदेशीर गोष्टी सभापती व प्रभारी सचिव करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. तरी विषयपत्रिकेवरील विषय क्र.7 व विषय क्र. 8 ला आमचा विरोध असतानाही याबाबतचा आमचा अर्ज स्वीकारला नसल्याने याबाबतची तक्रार जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. या तक्रार अर्जावर विखे गटाचे उपसभापती अभिषेक खंडागळे, नानासाहेब पवार, सुनील शिंदे, सरला बडाख, गिरिधर आसने यांच्या सह्या असल्याची माहिती उपसभापती अभिषेक खंडागळे, नाना पवार, यांनी दिली आहे.

उगाच संस्थेची बदनामी करू नका ः नवले

मागील मासिक बैठक कोरम अभावी रद्द करण्यात आली होती. ही तहकूब झालेली बैठक काल संध्याकाळी घेण्यात आली होती. या बैठकीत दोन विषयावर चर्चा करून त्याला मंजुरी घेण्यात आली. यावर आमच्या ससाणे, मुरकुटे गटाच्या संचालकांसह विरोधी गिरिधर आसने, जितेंद्र गदिया, किशोर कलांगडे या संचालकाच्या सह्या आहेत. विरोधी गटाचे काही संचालक बैठक आटोपल्यानंतर आल्याने त्यांचा विरोध किंवा इतिवृत्तावर सह्या घेण्याचा प्रश्नच येत नाही. या इतिवृत्तावर 14 संचालकांच्या सह्या झालेल्या असल्याची माहिती सभापती सुधीर नवले यांनी दिली. विरोधी संचालकांना त्यांचा विरोध दर्शवायचा असेल तर त्यांनी बैठकीत वेळेवर येऊन विरोध दर्शवावा उगाचच संस्थेची बदनामी होईल, असे करू नये, असेही सभापती नवले यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news