Sangamner Leopard Attack: संगमनेरमध्ये बिबट्या-रानडुकराचा धुमाकूळ; दोन शेतकरी गंभीर जखमी

कोल्हार खुर्दमध्ये बिबट्याचा हल्ला; खंदरमाळवाडीत रानडुकराने शेतकऱ्याला केले जखमी
Leopard Attack
Leopard AttackPudhari
Published on
Updated on

कोल्हार/ संगमनेर: शेतात जनावरांचा चारा काढत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना कोल्हार खुर्द येथील घोगरे वस्तीवर घडली. तर दुसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी माहूली परिसरात रानडुकराने ५६ वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला केल्याचे समोर आले.

Leopard Attack
Shrigonda Health System: श्रीगोंद्याच्या आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का; तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे

याबाबत माहिती अशी की, कोल्हार येथील अमोल दिनकर घोगरे (वय ३७) हे नेहमीप्रमाणे काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात जनावरांसाठी चारा काढण्याचे काम करत होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने थेट त्यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी घोगरे यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रतिकारामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली.

Leopard Attack
Pathardi Housing Scheme: पाथर्डीत १० हजार ५०९ घरकुले अपूर्ण; निधी घेऊनही काम न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतच त्यांनी कसेबसे घर गाठले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांना तातडीने कोल्हार येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेऊन नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

Leopard Attack
Sangamner Fake Liquor: संगमनेरमध्ये बनावट दारूचा पर्दाफाश; गोवा बनावटीच्या मद्यासह ५.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

तर, खंदरमाळवाडी माहूली येथील तुळशीदास गाडेकर हे सोमवारी सकाळी ते जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. शेताच्या बांधावर गवत कापत असताना अचानक रानडुक्कराने त्यांच्यावर हल्ला चढवत जखमी केले.

Leopard Attack
Grandfather Grandson Drowning: नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी शेततळ्यात उडी घेतली; दोघांचाही दुर्दैवी मृत्यू

यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर चावा घेवुन पंजाने गंभीर जखमी केले. संगमनेर येथे हलविण्यात आल्याची माहिती पांडुरंग गाडेकर यांनी दिली. वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news