Sangamner Farm Roads: संगमनेरातील ४५ शेतपानंद रस्त्यांना मंजुरी

मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतून शेतकरी वस्ती रस्त्यांच्या कामांना मंजुरी; वाहतूक होणार सुरळीत
Sangamner Farm Roads
पहिल्या टप्प्यातील रस्त्यांना मंजुरी :आमदार अमोल खताळPudhari
Published on
Updated on

संगमनेर: शेतकर्‍यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेद्वारे 45 रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

चंदनापुरी गावांतर्गत आनंदवाडी ते ठाकरवाडी, खांडगाव येथील अरगडे वस्ती ते बालोडे वस्ती , रायतेची अरगडे वस्ती ते रायतेवाडी शिवरस्ता , लोहारेची कदम वस्ती ते मोठेबाबावाडी , नान्नज दुमालाची काशाई मंदिर ते चत्तर वस्ती, निमोणचा काशिनाथ मळा ते सातभाई वस्ती, कोंची गावठाण ते धनगर वस्ती, खंडेरायवाडी ते धानोबा रस्ता, शिंदोडीची खामकर वस्ती ते झाप, निमजगाव ते खंडोबामळा, बांबळेवाडी गावठाण ते रामेश्वरदरा ,कणसेवाडी गावठाण ते कपालेश्वर,कर्जुले पठार गावठाण ते काटवनवाडी, गुंजाळवाडी गावठाण ते कुरणवाडी, सांगवी गावठाण ते कौठे धांदरफळ,

कौठे मलकापूर गावठाण ते चिमणटेक, वरवंडी गावठाण ते पोपळघाट वस्ती, कौठे धांदरफळ गावठाण ते माळ्याचा मळा, धुपेची गिर्‍हे वस्ती ते मामेखेल रोड, झोळे, गुंजाळ मळा खांडगाव ते विरबप्पा रस्ता, पोखरी हवेलीची गुंजाळ वस्ती ते खैरे वस्ती, हिवरगाव पठार, गोसावी वस्ती ते माऊली रोड , मालदाडचा घळाया ते मोरदरा, मोधळवाडीची घाणेवस्ती ते पिंपळदरा रोड, सुकेवाडीची घुलेवाडी शिव ते उगलेवाडा, मांडवे बु. चहाण पट्टा ते सैंदड पाईन रस्ता, कासारेचा चौगुले क्रेशर ते कोल्हे वस्ती, निमगाव भोजापूर चौफुली ते चिकणी शिवरस्ता,जवळे कडलग ते चिखली धांदरफळ शिव रस्ता साकुर जांबूत रोड ते काळशेत ,

निमगाव टेंभी, जाखुरी रोड ते पानोबा वस्ती दरेवाडीचा जानकर मळा ते मनसुक वस्ती, कोकणगाव शाळा ते इनाम वस्ती, वडगाव पान टोलनाका ते दत्त मंदिर शिव, कुंभारवाडीची ठाकरवाडी ते बिरोबा मंदिर, शिवापूर डफाळ वस्ती ते अवचितवाडी रोड, बोटाची तळपेवाडी ते हायवेपर्यंत मेंगाळवाडीची तावबा सोमनाथ वस्ती ते लक्ष्मण धावजी, कातोरे वस्ती ,तिगावचा कोकणगाव रोड ते कौठे कमळेश्वर , रायतेवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग ते रायतेवाडी गावा गट नं 57 खांबे, गावठाण ते इनाम धरती खांबे, गणेशवाडी ते गायकवाड वस्ती रायते वाडी, दिघे-राहाणे वस्ती ते रायते शिव तसेच येलखोपवाडी असे एकूण 1 किलो मीटर अंतराच्या तब्बल 45 शेतपानंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण केले जाणार आहे, असे आमदार खताळ यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतात उत्पादित केलेला शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचविणे, माल वाहतूक सुलभ व्हावी, शेतपानंद रस्ते व्हावेत, यासाठी सतत पाठपुरावा केला. दरम्यान, पहिल्या टप्प्यात संगमनेर तालुक्यातील 185 पैकी 45 शेतपानंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

आमदार अमोल खताळ, संगमनेर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news