मानसिक छळामुळे सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीमुळे खुलासा

सुनेसह चौघांविरोधात गुन्हा
Rahuri news
मानसिक छळामुळे सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची आत्महत्या; चिठ्ठीमुळे खुलासाFile Photo
Published on
Updated on

राहुरी तालुक्यातील सेवानिवृत्त बँक अधिकारी भाऊसाहेब कचरू ब्राम्हणे (67) यांचा मृतदेह घोरपडवाडी शिवारात आढळून आला. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत सून वर्षा विशाल ब्राम्हणे, व्याही चंद्रकांत दादा ओहोळ, राजेंद्र दगडू भोसले, पुतण्या सुनिल एकनाथ ब्राम्हणे यांच्याकडून होणार्‍या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी संबंधितांना अटक केली.

पोलीस ठाण्यात मयत भाऊसाहेब ब्राम्हणे यांच्या पत्नी लता ब्राम्हणे (62, रा. चिंचोली फाटा ता. राहुरी) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत म्हटले, मयत भाऊसाहेब ब्राम्हणे यांचा मृतदेह शुक्रवारी घोरपडवाडी शिवारात मृतदेह आढळल्याचे समजले.

पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा करत शवविच्छेदन प्रक्रिया केल्यानंतर मयत ब्राम्हणे खिशामध्ये सापडलेली चिठ्ठी व वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केल्यानंतर विषारी औषध प्राषण केल्याने मृत्यु झाल्याचा अहवाल दिला.

सापडलेल्या चिठ्ठीमध्ये मयत ब्राम्हणे यांनी आरोपी वर्षा विशाल ब्राम्हणे (सून, रा. चिंचोली फाटा) व्याही चंद्रकात दादा ओहोळ (रा. फत्याबाद ता. श्रीरामपूर), राजेंद्र दगडू भोसले (रा. श्रीरामपूर), पुतण्या सुनिल एकनाथ ब्राम्हणे (रा. चिंचोली फाटा) यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.

भाऊसाहेब ब्राम्हणे हे 2016 साली एचडीएफसी बँकेतून सेवा निवृत्त झाले. मुलगा विशाल ब्राम्हणे हे सिव्हील इंजिनियर असल्याने ते नेहमीच घराबाहेर असतात. दरम्यान, सासरे निवृत्त झाल्यानंतर विशाल ब्राम्हणे यांची पत्नी वर्षा हिने सेवानिवृत्तीच्या रक्कमेतून माझ्या नावे 20 लाख रुपये, तसेच एक एकर क्षेत्र नावावर करा असा लकडा लावला. याबाबत समजावून सांगितल्यानंतरही सून वर्षा हिने हट्ट न सोडता वडील, मामा तसेच चुलत दिर यांना हाताशी धरत मयत भाऊसाहेब ब्राम्हणे यांचा मानसिक छळ केला.

संबंधितांच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे मयत ब्राम्हणे हे वैफल्यग्रस्त झाले होते. 9 डिसेंबर रोजी ते दुपारी घरातून चौकात जाऊन येतो असे सांगत गेले. परंतू ते परतले नसल्याने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर खिशातील चिठ्ठी, तसेच सून व नातलगांनी दिलेला त्रास यामुळे संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लता ब्राम्हणे यांनी केली.

त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तक्रार दाखल करून घेत आरोपी वर्षा ब्राम्हणे, चंद्रकांत ओहोळ, सुनिल ब्राम्हणे यांना अटक केली. फरार आरोपी राजेंद्र भोसले यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी दिली.

16 डिसेंबरपर्यंत कोठडी

आरोपींना न्यायालयात हजर केले असता 16 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपी राजेंद्र भोसले याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. आरोपीचा शोध घेत अटकेची कारवाई करू अशी माहिती पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news