‘पहाटेच्या शपथविधी’ची पुन्हा आठवण ! पाच वर्षांपूर्वीच्या योगायोगाची पुन्हा चर्चा

अकोल्यात राजकीय योगायोगाची चर्चा; उद्याच्या मतमोजणीकडे
oathing ceremony
शपथविधीचा राजकीय योगायोग Pudhari
Published on: 
Updated on: 

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार? असा पेच निर्माण झाला आणि अनपेक्षितरीत्या घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्या पहाटे शपथ घेतली. योगायोग असा की, यंदा याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने ‘23’ तारखेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार, असा पेच निर्माण झाला होता. बरेच दिवस चर्चेचे गुर्‍हाळ चालल्यानंतर अनपेक्षित राजकीय घडामोडी घडून, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी भल्या पहाटे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदांची शपथ घेतली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वाधिक नाट्यमय घडामोडींपैकी एक मानला जात आहे. पहाटे स्थापन झालेले फडणवीस- पवार यांचे सरकार अवघे साडेतीन दिवसच टिकले. यामुळे ते संपूर्ण देशभर चर्चेत राहिले. आता पुन्हा एकदा 23 नोव्हेंबर तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरली आहे. यंदा याच दिवशी विधानसभा निवडणुकींतर्गत मतमोजणी होणार आहे. याच दिवशी राज्यात नेमकं सत्ता कोणाची येणार, हेही चित्र स्पष्ट होणार आहे.

यामुळे समाजमाध्यमांसह राजकीय नेत्यांकडून प्रचाराच्या रणधुमाळीत हा दिवस चर्चेत आला आहे. 2019 सालच्या निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्रित लढविल्या, मात्र मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्यावरून या दोन पक्षांमध्ये बिनसले होते. शिवसेनेने भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय घडामोडी वाढल्या. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करुन सरकार स्थापन केले. ते अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील फुटीनंतर कोसळले. यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते.

निकालाची उत्सुकता शिगेला!

‘23 नोव्हेंबर’ 2019 रोजी पहाटेचा शपथविधी’ झाला होता. आता पुन्हा याच तारखेला विधानसभेची मतमोजणी उद्या (23) रोजी होणार असल्याने या दिवशी कुणाच्या बाजुने मतदार कौल देणार, ही चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र सुरू आहे. महाविकास आघाडी, महायुती तर तिसर्‍या आघाडीसह अन्य पक्ष रणांगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची ठरली. या निवडणूक निकालाच्या माध्यमातून अनेकजण ‘पहाटेच्या शपथविधी’च्या आठवणींना उजाळा देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news