Rahuri News: कुत्र्याचे पिल्लू शोधणाऱ्या तरुणाला मारहाण; राहुरी फॅक्टरी येथील आठ जणांविरुद्ध गुन्हा

‘सलमानजवळ शिवीगाळ केली का?’ असे विचारत टोळक्याने तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विट मारून जखमी केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप.
Rahuri News
Rahuri NewsPudhari
Published on: 
Updated on: 

राहुरी: ‘तू सलमानजवळ मला शिवीगाळ केली काय?’ असे म्हणत आठ जणांच्या टोळक्याने एका २१ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. विट मारून जखमी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित नंदुलाल उल्हारे (वय २१, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) या तरुणाने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. (दि. २ नोव्हेंबर) रोजी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अभिजित व त्याचा मित्र यश साळवे हे दोघे हरवलेले कुत्र्याचे पिल्लू शोधत होते. यावेळी त्यांना सलमान नामक तरुण भेटला.

Rahuri News
Ahilyanagar District Bank Election: ठरावाचे राजकारण अन् फसलेली स्वप्ने

अभिजित याने त्याला, ‘कुत्र्याचे पिल्लू पाहिले का, अशी विचारले, यावरून सलमान याने त्याला शिवीगाळ केली. अभिजित व यश पुढे गेले असता, मोटारसायकलवरून टोळके तेथे आले. ‘तू सलमनजवळ मला शिवीगाळ केली काय?’ असे म्हणत त्यांनी अभिजितयाला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विटेने मारून जखमी केले. ‘यापुढे अशु सांगळे याला काही बोलला किंवा शिवीगाळ केली, तर जीवे मारू,’ अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले.

Rahuri News
Dheeraj Pardeshi Case: धीरज परदेशी खूनप्रकरणी ७५० पानांचे दोषारोपपत्र; खून व कट रचल्याचा आरोप

याप्रकरणी अभिजित उल्हारे यांच्या फिर्यादीवरून अशु सांगळे, आदी पाळंदे, साई पाळंदे, सलमान अस्लम शेख (सर्व रा. राहुरी फॅक्टरी) व अन्य चार अनोळखी तरुण अशा आठ जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.