महिनाभरात पाणी योजनेचा वीजपुरवठा बारा वेळा खंडित; आयुक्तांचे महावितरणला पत्र

तांत्रिक अडथळ्यामुळे अधिकारी हैराण
Nagar News
महिनाभरात पाणी योजनेचा वीजपुरवठा बारा वेळा खंडित; आयुक्तांचे महावितरणला पत्रPudhari
Published on
Updated on

नगर: शहराच्या पाणी पुरवठा योजनेवरील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. 15 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत 12 वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद पडून शहराला नियमित व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत गांभीर्याने दाखल घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे पत्र प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे.

वीज पुरवठा काही मिनिटे खंडीत झाला तरी मुळानगर, विळद व नागापूर येथील कार्यरत पंपिंग स्टेशन येथून पाणी उपसा सुरळीत होण्यास सुमारे दोन ते तीन तासाचा अवधी लागतो. त्यामुळे अनियमित पाणी उपसा होऊन शहरातील वितरणासाठीच्या टाक्या वेळेत भरता येत नाहीत.

पर्यायाने शहरास नियमित व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सातत्याने विस्कळीत होत असल्याने मुळानगर, विळद व नागापूर येथील पंपिंग स्टेशन पंपिंग चालू बंद करावी लागत असल्याने मुळानगर ते वसंत टेकडी दरम्यान कार्यरत मुख्य जलवाहिन्यांची व पंपिंग मशिनरींचे नादुरूस्तीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे.

सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील पाणी पुरवठाही सातत्याने विस्कळीत होत आहे. याबाबत वेळीच दक्षता न घेतली गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबधितांना तातडीने आदेश देण्यात यावेत. अन्यथा यापुढे खंडीत वीज पुरवठ्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास निर्माण होणार्‍या परिस्थितीस महावितरण विभाग जबाबदार राहील, असे पत्रात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news