पारनेर : अण्णा हजारे म्हणाले की, सुरुवातीला अरविंद केजरीवाल माझ्यासोबत होता, तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते. मात्र पक्ष आणि पार्टी जेव्हा काढली तेव्हापासून मी त्याची साथ सोडली. चुकीचे वागले तर निवडणुकीत जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.
केजरीवाल यांच्याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले संदर्भात बोलताना ते म्हणाले मला तो चांगला वाटला होता. त्याचे आचार विचार चांगले होते. त्याच्या डोक्यात पक्ष आणि पार्टी नव्हती. मात्र, आता हेच दारूबाबत बोलत आहेत. दारूसाठी आम्ही आंदोलन केले होते त्यावेळी ते देखील आमच्यासोबत होते. आता तेच दारूबाबत बोलत आहेत त्यामुळे मी त्याला सोडून दिले. काही लोक सांगतात की, अण्णा हजारे यांच्यामुळे हे आलेत. मात्र, ही गोष्ट चुकीची आहे. सुरुवातीला तो चांगला माणूस होता, नंतर मला जेव्हा समजलं तेव्हा मी त्याच्यापासून दूर झालो,
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यावरून अण्णा हजारे यांनी मतदारांना आवाहन केले आहे. जो उमेदवार आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे? त्याचे आचार-विचार कसे आहेत? त्याचे जीवन कसे आहे? हे पाहूनच मतदान करा, असे आवाहन त्यांनी दिल्लीतील मतदारांना केले आहे.