Pathardi Police Station: पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर मायलेकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

अत्याचार, मारहाण व चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी; गदारोळात एका व्यक्तीचा मृत्यू
Police Station
Police Station Pudhari
Published on
Updated on

पाथर्डी: अत्याचार, मारहाण व चोरीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत औरंगपूर येथील एका महिलेने सोमवारी सायंकाळी पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर आपल्या मुलासह आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिस व होमगार्ड यांनी तत्परता दाखवत दोघांनाही रोखल्याने अनर्थ टळला.

Police Station
Ahilyanagar Private Classes Regulation: अहिल्यानगरमध्ये खासगी क्लासेसवर कारवाईची तयारी; शिक्षण विभागाचे तपासणी आदेश

औरंगपूरची संबंधित महिला व तिचा मुलगा सायंकाळी सातच्या सुमारास पोलिस ठाण्यासमोर आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणा दिल्या. त्यानंतर अचानक त्यांनी अंगावर ज्वलनशील द्रव ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

Police Station
Ahilyanagar MLC Election 2026: अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

पोलिस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विशाल लहाने तसेच होमगार्ड यांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू हेही तातडीने तेथे दाखल झाले. पोलिसांनी त्या मायलेकाला शांत करत त्यांची लेखी तक्रार देण्याचे आवाहन केले. त्यानंतर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की शेतीच्या जुन्या वादातून शेजारी त्यांना सातत्याने त्रास देत आहेत.

Police Station
Electric Wire Accident: जामखेडमध्ये विजेच्या तारेला स्पर्श होऊन दोन बैलांचा मृत्यू; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

1 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. काही जणांनी घरात घुसून मारहाण, शिवीगाळ व धमक्या दिल्या आणि काहींनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत केला आहे. तीन लाख रुपये, सोन्याचे दागिने, मोबाईल व लॅपटॉप चोरून नेल्याचाही दावा त्यांनी केला. याबाबतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेले मोबाईलदेखील आरोपींनी नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. एकूण 16 जणांविरुद्ध ही फिर्याद असून त्यात किलबिले कुटुंबातील सदस्यांसह अन्य व्यक्तींचा समावेश आहे.

Police Station
Ahilyanagar Police Mock Drill Accident: अहिल्यानगरमध्ये मॉकड्रिलदरम्यान मोठा अपघात; स्नो ग्रेनेड फुटून 4 पोलीस जखमी

गदारोळात एकाचा मृत्यू

पोलिस ठाण्याच्या आवारात मायलेकाचा आत्मदहनाचा प्रयत्न सुरू असतानाच तेथे उपस्थित असलेले विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45, रा. आखेगाव, ता. शेवगाव) अचानक कोसळले. पोलिसांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news