Pathardi Ration Shop: पाथर्डीतील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित; अनामत रक्कमही जप्त

गहू तांदूळ आणि ज्वारीच्या साठ्यात तफावत; २६ लाभार्थ्यांनी केल्या तक्रारी
Ration Shop
Ration ShopPudhari File photo
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ महिला बचत गटाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरणात अनियमितता आणि साठ्यात तफावत आढळून आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी संबंधित दुकानाचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. दुकानाची १०० टक्के अनामत जप्त करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

पाथर्डी तहसीलदाराच्या तपासणी अहवालानुसार, संबंधित स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ आणि ज्वारीच्या साठ्यात मोठी तफावत आढळली. याशिवाय २६ लाभार्थ्यांच्या जबाबांमध्ये धान्य कमी मिळणे, पावती न देणे, नियमित धान्य वितरण न करणे आणि दुकान वेळेत सुरू नसणे अशा तक्रारी समोर आल्या. संबंधित दुकानचालकांने कारणे दाखवा नोटिशीवर सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे प्रशासनाने आदेशात म्हटले आहे.

Ration Shop
Ahilyanagar Farmers Solar Scheme: शेतकऱ्यांच्या घरांत आता जिल्हा बँकेतून सौरप्रकाश! पहिल्याच बैठकीत ‘सरप्राईज’ विषयांवर सकारात्मक चर्चा

दरम्यान, संबंधित दुकानाशी संलग्न लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हत्राळ येथील बाबासाहेब पाराजी गणेशकर यांच्या स्वस्त धान्य दुकानाला संबंधित लाभार्थ्यांचे नियतन जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना नियमित धान्य वितरणाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.