Poladpur Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

पोलादपूरजवळ उभ्या कंटेनरवर कारची जोरदार धडक; वडील आणि पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

पोलादपूर/पाथर्डी: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच शनिवारी (दि. 30) दुपारी पोलादपूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाथर्डी तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर बापलेक गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार आदळल्याने हा अपघात घडला.

Accident
Prajakt Tanpure BJP Entry: प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा भूकंप, बदलणार नवी समीकरणे

अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील मूळ रहिवासी तथा दापोली (जि.रत्नागिरी) येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले अनिल रावसाहेब मरकड हे पत्नी सुवर्णा मरकड, मुलगी अनुश्री मरकड व मुलगा चिन्मय मरकड यांच्यासह सुट्टीनिमित्त गावी आले होते.

Accident
Akole Onion Farmers Protest: अकोल्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

शनिवारी सकाळी निवडुंगे येथून ते कुटुंबासह कारमधून (एमएच 08 एएन 2439) दापोलीकडे जात होते. दुपारी तीनच्या सुमारास पोलादपूरजवळ त्यांच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (एमएच 04 एलवाय 1638) जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

Accident
Ahilyanagar Police Shakeup: अहिल्यानगरमध्ये पोलिस यंत्रणेत मोठे बदलाचे संकेत; एसपी मुम्मका सुदर्शन यांच्या कारवाईने खळबळ

या अपघातात अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा (वय 45) आणि मुलगी अनुश्री (वय 16) यांचा जागीच मृत्यू झाला. अनिल मरकड (वय 44) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा चिन्मय गंभीर जखमी झाले असून, अनिल यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले, तर चिन्मयवर महाड येथे उपचार सुरू आहेत.

Accident
Ahilyanagar JCB Bike Accident: धनगरवाडीजवळ जेसीबी-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

अनिल मरकड यांचे वडील रावसाहेब राजाराम मरकड व आई मुक्ताबाई मरकड हे निवडुंगे येथे वास्तव्यास आहेत. सुवर्णा मरकड या रत्नागिरी जिल्ह्यातील स्टेट बँकेत कार्यरत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news