Ahilyanagar Fraud news : मैत्रीला कलंक ! मित्राचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावरील प्लॉटची परस्पर विक्री

तोतया व्यक्तीकडून बंटी आछडाचा तिसरा प्रताप; श्रीरामपुरात सहा जणांविरुद्ध गुन्हा
Fraud News
मित्राच्या नावावरील प्लॉटची परस्पर विक्री File Photo
Published on
Updated on

Fraud News : श्रीरामपूर

मित्राचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावरील तालुक्यातील शिरसगाव व श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील बखळ प्लॉटची बनावट व्यक्ती उभी करून, परस्पर विक्री करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बंटी आढडा, मित्र व एजंटासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

येथील संकेत रावसाहेब भोसले यांनी शहरातील वार्ड नं. 6, कामगार हॉस्पिटलजवळील गिता मोहन आछडा, यांच्याकडून शिरसगाव व नगरपरिषद हद्दीतील बखळ प्लॉटस् 2023 मध्ये खरेदी केले होते. प्लॉटस् खरेदीसाठी त्यांनी सुमारे 12 लाखांचे कर्ज घेतले होते. तसा दस्त येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविला होता. यानंतर फेरफार होवून, संकेत रावसाहेब भोसले याचे नाव 7/12 उतार्‍यावर लागले. जागा खरेदीच्यावेळी संकेत याने आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, साई संकेत ट्रेडर्सचे लायसन असे सर्व मुळ कागदपत्र मित्र व व्यवसायातील भागीदार भरत मोहन आछडा ऊर्फ बंटी आछडा याच्याकडे ठेवले होते. संकेत भोसले याची डस्टर कारही आछडा याच्या ताब्यात होती.

दरम्यान, 2024 मध्ये जून महिन्यात संकेत रावसाहेब भोसले यांचे बाभळेश्वरजवळ अपघाती निधन झाले. या निधनानंतर त्यांचे बंधू प्रितेश रावसाहेब भोसले शिरसगाव कामगार तलाठ्याकडे उतारा काढण्यास गेले असता, त्यांना भाऊ संकेत याच्या प्लॉटच्या उतार्‍यावरील नाव कमी होवून, विद्या दादासाहेब क्षिरसागर यांचे नाव लावलेले दिसले. यावर त्यांनी फेरफार नोंदी काढल्या असता, 2 ऑगस्ट रोजी या प्लॉटस्ची खरेदी दुय्यम निबंधक कार्यालयात झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे भाऊ संकेत भोसले मृत पावल्यानंतर मित्र व व्यवसाय भागीदार बंटी आछडा याने खोटी कागदपत्रे तयार करून, प्लॉट दुसर्‍याच्या नावावर करून घेण्याचा हा तिसरा गैरप्रकार केला. विशेष असे की, यापूर्वी खटोड यांच्या कुटूंबियांची प्रॉपर्टी नावावर करून, घेतल्याचा त्यांच्या कुटूंबातील लोकांवर गुन्हा दाखल आहे.

Fraud News
अडीच किलोची बट अन भोंदूबाबा; श्रीरामपूरच्या महिलेची अंधश्रद्धेच्या जोखडातून अशी झाली सुटका

खोटे कागदपत्र वापरून भाऊ संकेत यांच्या नावावरील मिळकत त्याने विद्या दादासाहेब क्षिरसागर यांना परस्पर विकल्याचे सिद्ध झाले आहे. याकरीता बंटी आछडा याने, तोतया इसमाला संकेत भोसले म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयात उभे केले. जागा खरेदीच्या वेळी साक्षीदार गणेश जगन शिरसाट याला गटात सहभागी करून, त्याच्यासह प्रशांत दत्तात्रय खरात यांना साक्षीदार म्हणून उभे केले. बंटी आछडा व खरेदी -विक्री एजंट यांनी दस्ताऐवज बनावटीची सर्व पूर्व तयारी करून, 2 ऑगस्ट 2024 रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात संकेत रावसाहेब भोसले यांच्या नावावरील मिळकत विद्या दादासाहेब क्षिरसागर यांना संगनमताने विक्री करून, फसवणूक केली आहे.

Fraud News
पुणे तिथे काय उणे! 'मेट्रो'मध्ये पुणेरी पाट्यांचा 'मराठी बाणा'

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात प्रितेश रावसाहेब भोसले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भरत मोहन आछडा ऊर्फ बंटी आछडा, विद्या दादासाहेब क्षिरसागर, गणेश जगन शिरसाट, प्रशांत दत्तात्रय खरात, एक खरेदी-विक्री एजंट व एक अज्ञात इसम अशा 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news