

पूर्ववैमनस्यातून नगर-भिंगार रस्त्यावरील विजय लाईन चौकात 10 जानेवारीला लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाने तरुण व्यावसायिकांवर हल्ला केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बाबा ग्रुपचा अध्यक्ष प्रताप सुनील भिंगारदिवे (रा. पंपिंग स्टेशन, सावतानगर, भिंगार), शुभम ऊर्फ गुब्या शिंदे (पूर्ण नाव नाही, रा. महेशनगर, भिंगार), करण भिंगारदिवे (पूर्ण नाव माहिती नाही), प्रशांत ऊर्फ सोनू सुनील भिंगारदिवे, रूपेश शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही), अक्षय जावळे, विशाल ऊर्फ बजरंग ससाणे, ओंकार ऊर्फ भैया चांदणे (पूर्ण नावे माहिती नाहीत, सर्व रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जखमी अक्षय संजय हांपे (वय 29 रा. सौरभनगर, भिंगार) यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हांपेवर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिर्यादी अक्षय हे जिममधून येत असताना संशयित आरोपींनी त्यांना रस्त्यात आडवले व करण भिंगारदिवे सोबत पूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडांनी हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अक्षय यांच्यावर अहिल्यानगरमधील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे अधिक तपास करत आहेत.