

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील एका शाळेमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.(Latest Ahilyanagar News)
श्रीरामपूर शहरालगत दत्तनगर परिसरात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी चुलत बहिणीसमवेत मंगळवार (दि. ३०) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील वॉर्ड नं. ७ मधील एका शाळेमध्ये नवरात्रीनिमित्त आयोजित दांडिया कार्यक्रमास गेली होती. घेण्यासाठी शाळेच्या गेटवर गेले असता, मुलीने मोबाईल कॉल करून, कार्यक्रमात आहे, असे सांगितले. यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत वडील तिची वाट पाहत होते, परंतू ती आली नाही.
यानंतर मुलीच्या दुपारी ३ वाजता मुलीने तिच्या आईने मोबाईल कॉल करून सांगितले की, 'मुलीच्या मोबाईल कॉलवर एका पुरुषाचा आवाज आला. त्याला मुलीबाबत विचारले असता, त्याने मी अमीत पटारे बोलत आहे. तुमच्या मुलीला मी पळवून आणले आहे. ती माझ्यासोबत आहे. काय करायचे ते करून घ्या,' असे म्हणत त्याने फोन कट केला, असे आईने सांगितले.