Ahilyanagar: एमआयडीसीचे प्रश्न लवकरच सुटणार; मुख्य अभियंता वानखेडे यांचे आश्वासन

नगरच्या उद्योजकांनी वाचला समस्यांचा पाढा
Ahilyanagar News
एमआयडीसीचे प्रश्न लवकरच सुटणार; मुख्य अभियंता वानखेडे यांचे आश्वासनPudhari
Published on
Updated on

Ahilyanagar News: शहरातील एमआयडीसीमधील रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज लाईन, कचरा, टपर्‍यांचे अतिक्रमण आदी समस्या सोडविण्याबाबत एमआयडीसीचे मुख्य अभियंता (मुंबई) नितीन वानखेडे यांच्यासोबत नगरमधील उद्योजकांची बैठक पार पडली. यावेळी वानखेडे यांनी समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी एस. ई. राहुल तिडके, आर. पी. थोटे, एमआयडीसीचे उपअभियंता बडगे आदींसह उद्योजक उपस्थित होते.

उद्योजकांच्या वतीने विविध प्रश्नांचे निवेदन एमआयडीसीचे मुख्य अभियंता वानखेडे यांना देण्यात आले. सन फार्मा ते निंबळक रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ते काम सीईओ यांना भेटून मार्गी लावण्यात येईल. त्यामध्ये असणारी खड्डे 8 ते 10 दिवसांमध्ये बुजविली जाणार आहेत.

एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते व साईड पट्ट्यांची कामे एक महिन्यामध्ये पूर्ण केली जातील. पंपिंग स्टेशन ते एमआयडीसी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम लवकच करण्यात येईल. एल ब्लॉकमधील गटारीमुळे कंपन्यांमध्ये पाणी जात असून, त्याचे नियोजनाचे काम एक महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. भूमिगत गटारी एका महिन्यात स्वच्छ करण्यात येतील.

एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यालगत असणारी झाडे-झुडपे एक महिन्यात काढण्यात येतील. एम ब्लॉकमध्ये रस्त्यावरील कचर्‍यामुळे त्या भागात अतिशय दुर्गंधी पसरत आहे. त्यासाठी दर 15 दिवसांनी जेसीबीच्या सहाय्याने कचरा उचलण्यात येईल. एमआयडीसीमध्ये टपर्‍यांचे अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तरी ते लवकरच काढण्यात येईल.

स्ट्रीट लाईटचा लुमिनियस (होलटेज) कमी असल्यामुळे पुरेसा प्रकाश पडत नाही, त्यासाठी लवकरच नवीन बल्ब बसिवण्यात येणार असल्याचे आश्वासन उद्योजकांच्या शिष्टमंडळास एमआयडीसीचे मुख्य अभियंता वानखेडे यांनी दिले. या बैठकीसाठी जयद्रथ खाकाळ, महेश इंदाणी, प्रफुल पारख, निनाद टिपुगडे, अमोल घोलप, सागर निंबाळकर, राजेंद्र कटारिया, सचिन पाठक, सतीश गवळी, प्रसन्न कुलकर्णी, गणेश बेरड, सुमित लोढा, प्रमोद मोहोळे, सचिन काकड आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news