

नगर: मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी(दि.10) अहिल्यानगरात मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईला होणार्या उपोषणाबाबत नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान, जरांगे शनिवारी (दि.9) रात्री अहिल्यानगरात मुक्कामी येणार आहेत. (Latest Ahilyanagar News)
मुंबई येथील उपोषणाच्या पूर्वतयारीनिमित्त मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 10 वाजता बैठकीस प्रारंभ होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, मुंबईतील उपोषणात सहभागी होणारे कार्यकर्ते तसेच समन्वय समितीचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या बैठकीत मुंबईतील उपोषणाचे नियोजन तसेच जिल्हाभरातील किती जण सहभागी होणार यावर चर्चा होणार आहे.