

कोपरगाव : नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्याने तरुणाचा बळी घेतला. खड्ड्यात मोटारसायकल आदळून रस्त्याकडेला पडलेल्या तरुणाच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Latest Ahilyanagar News)
अदित्य कैलास देवकर (रा. इंदिरापथ, कोपरगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव नजीक मोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अदित्य याच महामार्गावरून जात होता. येवला नाक्याजवळ खड्ड्यात त्याची मोटारसायकल आदळून तो रस्त्याकडेला पडला. त्याचवेळी पाठीमागून येणारे वाहन त्याच्या अंगावरून गेले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कोपरगावचे नागरिक घटनास्थळी पोहचले. खड्डयांनी बळी घेतल्याचा आरोप नागरिकांनी प्रशासनाला निषेध केला.