नगर : अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी आणि राज्य वरिष्ठ गट अजिक्यपद कुस्ती स्पर्धेत विविध वजन गटात माती आणि गादी विभागात कोल्हापूर व सोलापूरच्या मल्लांनी सर्वांत जास्त सुवर्णपदकांवर नावे कोरली. धुळे आणि धाराशिवच्या मल्लांनीदेखील कमाल करीत सुवर्णपदके पटकावली. बक्षीस वितरण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक, प्रमाणपत्र व बुलेट देण्यात आल्या.
वाडिया पार्कमध्ये उभारलेल्या कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी येथे 29 जानेवारी ते 4 फेब्रवारी जंगी महाराष्ट्र केसरी कुस्त्यांची दंगल पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्यातील सुमारे 43 संघ यामध्ये सहभागी झाले होते.
त्यात 75, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 अशा विविध वजन गटांत सुमारे 860 मल्लांनी सहभाग घेऊन कुस्त्या केल्या. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव येथील मल्लांनी चित्तथरारक कुस्त्या केल्या. चित्तरारक, अफलातून कुस्त्या नगरकरांना पाहायला मिळाल्या. माती विभागातील लढतीने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. माती विभागात धुळ्याच्या चंद्रशेखर गवळीने सोलापूरच्या मल्ला नमवत जिल्ह्यासाठी सुवर्णपदक नेले. सातार्याच्या संदेश शिपकुले याने प्रतिर्स्पिधी पैलवानाला हरवत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर, गादी विभागात धाराशिवच्या मुंतजिर सरनोबतने अहिल्यानगरच्या पैलवानाला हरवत सुवर्णपदक पटकावले. या तिघांचा अपवाद वगळता माती व गादी विभागातील सर्वच सुवर्णपदके कोल्हापूर शहर, जिल्हा व सोलापूर शहर जिल्ह्याच्या मल्लांनी पटकाविली
सौरभ इगवे, सोलापूर, जिल्हा (57)
सूरज अस्वले, कोल्हापूर शहर (61)
सद्दाम शेख, कोल्हापूर, जिल्हा (65)
सुशांत देशमुख, सोलापूर, जिल्हा (70)
अक्षय चव्हाण, पुणे शहर (74)
संदेश शिपकुले, सातारा (79)
चंद्रशेखर गवळी, धुळे (86)
विश्वचरण सोलनकर, सोलापूर जिल्हा (92)
रोहन पवार, सोलापूर जिल्हा (97)
गादी विभागातील सुवर्णपदक विजेते (वजन गट)
वैभव पाटील, कोल्हापूर जिल्हा (57)
अजय कापडे, कोल्हापूर जिल्हा (61)
ज्योतिबा आटकळे, सोलापूर (65)
सौरभ पाटील, कोल्हापूर (70)
आदर्श पाटील, कोल्हापूर (74)
शुभम मगर, सोलापूर शहर (79)
मुन्तजिर सरनोबत, धाराशिव (86)
श्रेयस गाट, कोल्हापूर (92)
कालिचरण सोलनकर, सोलापूर (97)
माती विभागात युवराज चव्हाण, सचिन मुरकुटे, पारस बीडकर, विश्वजित सुरवसे, शुभम लांडगे, कुमार देशमाने, चैतन्य शेळके, सोहेल शेख, सौरभ मराठे, सौरभ शिंदे, ऋषिकेश शेळके, हर्षवर्धन पठाडे, हर्षवर्धन पठाडे, आकाश चव्हाण, रोहित मोढळे, तुषार सोनवणे, विक्रम शेटे. गादी विभागात चेतन रेपाळे, सुदर्शन कोतकर, संकेत सातरकर, अभिजित वाघुले, महेश शेळके, ऋषिकेश उचाळे, दीपक पवार, मयूर तांबे, सौरभ गाडे, गणेश शेटे, नीलेश उचाळे, आकाश घोडके, महेश फुलमाळी, ऋषिकेश लांडे, आकाश भिंगारे, विजय पवार, हर्षवर्धन पठाडे, आकाश चव्हाण, रोहित मोढळे, तुषार सोनवणे, विक्रम शेटे