

कर्जत : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्याचे तीव्र पडसाद कर्जतमध्ये उमटले. त्याच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. (Latest Ahilyanagar News)
समाजकंटकाने या सोशल मीडियावर या दोन्ही महापुरुषांविषयी संताप जनक पोस्ट टाकली. त्याचे तीव्र पडसाद कर्जतमध्ये उमटले. शुक्रवारी रात्री कर्जत पोलिस ठाण्यात शेकडो युवक जोरदार घोषणाबाजी करीत एकत्र आले. त्यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित समाजकंटकला तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
यावेळी सनी पवार, दादा थोरात, पप्पू सुर्वे, विशाल काकडे, आशिष पवार, सुधीर पवार, राहुल पवार, कपिल पवार, रुद्र भिसे, संजय पवार, अशोक पवार, दिगंबर पवार यांच्यासह मोठ्या संख्येने अनेकजण उपस्थित होते. यावेळी बंदचे निवेदनही देण्यात आले. रिपब्लिकन पक्षाने बंदला पाठिंबा दिला होता.