Jamkhed Accident : चिंचखेडजवळ ट्रक-दुचाकीची भीषण धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

गुरूवारी (दि. ५) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अंबड–पाचोड रस्त्यावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

जामखेड : गुरूवारी (दि. ५) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास अंबड–पाचोड रस्त्यावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

चालक रोहन मोहन काळे (वय २१, रा. पागिरवाडी, ता. अंबड, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस चौकीचे जमादार रवींद्र चव्हाण व कॉन्स्टेबल शरद क्षीरसागर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणास खाजगी वाहनातून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील ट्रक व मोटारसायकल ही दोन्ही वाहने तपासासाठी अंबड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, या प्रकरणाची नोंद अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव असल्यामुळे या रस्त्यावर वारंवार छोटे-मोठे अपघात घडत असतात. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news