

Rahuri News: राहुरी मतदार संघातील पाथर्डी परिसरातील जोहारवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आ.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. प्रवेश झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आ. तनपुरे यांनाच मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजले.
राहुरी येथे काही दिवसांपूर्वीच लोहसर, तिसगाव व भोसे येथील शेकडो तरुणांनी आ.तनपुरे यांना पाठबळ दिल्यानंतर जोहारवाडी गावातही भाजपला खिंडार पडल्याचे दिसून आले आहे. पाथर्डी परिसरातून आ. तनपुरेंना मोठे मताधिक्य देण्यासाठी शेकडो युवकांची फळी राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाली.
गुरूवारी (दि.31) रोजी सायंकाळी जोहारवाडी (ता.पाथर्डी) येथील सुरेश वांढेकर, आदिनाथ आठरे, शरद कराळे, जयराम गायकवाड, अरविंद चव्हाण, निलेश सावंत, राहुल गायकवाड, रामनाथ वांढेकर, भाऊराव म्हस्के, आप्पासाहेब फुलारे, आदिनाथ सावंत, सिद्धेश वांढेकर, निलेश कुटे, तुषार सावंत, सचिन वांढेकर, सागर म्हस्के, अनिल वांढेकर, सुरेश सावंत, अशोक अडसुरे, सोमनाथ फुलारे, संजय निमसे, कानिफ वांढेकर, बंडू सावंत, प्रदिप कराळे, गोविंद चौधरी, शिवनारायण ससे, दादासाहेब सावंत, महादेव कराळे, संतोष ससे, अमोल वांढेकर, विलास टेमकर, नारायण सावंत, संजय सावंत, भाऊ शिंदे, दत्तात्रय मगर, दत्तात्रय आठरे आदींनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केल्यानंतर आ. तनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होतो. मागिल निवडणुकातही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. कर्डिलेंकडून केवळ आश्वासन मिळाले. रस्त्यांच्या समस्या तसेच पाण्याचा प्रश्न मांडूनही केवळ शब्द देऊन आमची अवहेलना झाली.
कर्डिले गटाने कार्यकर्त्यांमध्ये वाद लावत खोटे गुन्हे दाखल करीत आमच्यावर अन्याय केला. परंतु आ. तनपुरे यांनी कधीही भेदभाव न करता सबस्टेशन, वीज रोहित्र, रस्ते, पाण्याच्या समस्या सोडविल्या. यापुढील काळात आ. तनपुरेंना पाठबळ देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे जोहारवाडी येथील तरुणांनी सांगितले.
राहुरी येथे आ. तनपुरे यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी पाथर्डी येथील अमोल वाघ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव, माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे व नंदकुमार गागरे यांची उपस्थिती होती.
विकासासाठी सदैव अग्रेसर - आ. तनपुरे
माझ्या कुटुंबियांकडून प्रत्येकाचा आदर करण्याची शिकवण मिळाली आहे. आमदारकी मिळाल्यानंतर गट, तट व पक्षाचा विचार न करता प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. गुन्हेगारी, वाद निर्माण करीत तेढ वाढविण्यापेक्षा विकासात्मक कामे हाच माझा संकल्प राहिलेला आहे. त्याच संकल्पावर कायम राहत नेहमीच विकासात्मक कामांनाच पाठबळ देऊ असे आश्वासन आ.प्राजक्त तनपुरे यांनी दिले.