अकोल्यात सर्रास दारूची अवैध विक्री ; पोलिस, दारूबंदी अधिकार्‍यांची ‘अर्थ’पूण डोळेझाक

अवैध दारुची खुलेआम विक्री
Ahilyanagar news
देशी दारूची अवैध विक्रीPudhari File Photo
Published on
Updated on

अकोले : अकोले शहरासह तालुक्यात अवैध दारूचा जणू महापूर आल्याचे संतप्त चित्र याची देही, याची डोळा दिसत आहे. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासह पोलिसांनी या अवैध बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, परंतू कोणालाही या प्रश्नाचे काहीच देणे-घेणे वाटत नाही का, असा संतप्त येथील सवाल जागरुक नागरिक उपस्थित करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुका हद्दीतील खिरविरे, समशेरपूर, विरगाव फाटा, डोंगरगाव, देवठाण, मुथाळणे, कोतुळ, बेलापूर, बाम्हणवाडा, इंदोरी फाटा, रुंभोडी, खडकी, शाहुनगर, वाकी, रंधाफाटा, मान्हेरे, मुरशेत, पिपरकणे, लिंगदेव, चास, गणोरे, सातेवाडी, केळी रुम्हणवाडी, बाभळवंडी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या देशी- विदेशी दारुची सर्रास विक्री केली जात आहे. अकोले शहर व कोतुळ येथून अवैधरीत्या - देशी-विदेशी दारूची किरकोळ विक्रेते परवानाधारकांकडून ठोक स्वरूपातचार चाकी व नंतर मोटारसायकलवरून शहरी व ग्रामीण भागात पाहिजे, तेथे पाहिजे त्याला अवैध दारु राजरोस पुरविली जात आहे. हा गैरप्रकार अकोले, राजूर पोलिस किंवा संगमनेरचे दारु उत्पादन शुल्कचे अधिकार्‍यांच्या लक्षात कसा येत नाही, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

अकोले तालुक्यात एखादी अपघाताची घटना घडल्यास तेवढ्या तत्परतेने रुग्णवाहिका पोहोचत नसेल, तेव्हड्या तत्परतेने अवैध दारू पोहोचविली जात आहे. यामुळे पहाटे 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत विना परवाना काही हॉटेल्ससह ढाबे, खानावळ, पाणटपर्‍या अशा ठिकाणी अवैध दारुची खुलेआम विक्री होत आहे. यामुळे अकोलेतील कायदा- सुव्यस्थेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ड्राय डे (कोरडा दिवस) असलेल्या दिवशी अकोले - भंडारदरा (शेंडी) मेन रोडसह अकोले व कोतुळ या शहरातील अनेक भागासह तालुक्यातील बहुतांश गावागावात खुलेआम अवैधपणे दारू उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसते. काही परवाना धारक दुकानदार व बियरबारवाल्यांकडून मागच्या दरवाजाने सर्रास मद्याची विक्री होते. अवैध दारु विक्री वाढल्याने व्यसनाधिनाता वाढत आहे. अवैध दारु विक्रेत्यांना अकोले, राजूर पोलिसांसह संगमनेरचे दारु उत्पादन शुल्क अधिकार्‍यांच्या ‘अर्थ’पूर्ण संबंधातून धुपा पाठिंबा मिळत आहे की काय, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.

याला जबाबदार कोण..?

गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील कोतुळसह राजूर, भंडारदरा, बाम्हणवाडा, विरगाव फाटा, इंदोरीफाटा आदी भागात अवैध दारू विक्रीचा गोरखधंदा राजरोस सुरू आहे, परंतू कोणाचेही या गैरप्रकाराकडे लक्ष गेल्याचे वास्तव चित्र दिसत नाही. पहाटे 5 वाजेपासून अगदी सहज अवैध दारू विकत मिळत असल्याने युवा, तरुण दारूच्या आहारी जात आहेत. व्यसनामुळे काही तरुणांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत. त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अवैध मार्गाने होणार्‍या अवैध दारुची विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news