

संगमनेर: ग्रामसेवकाकडे निधी खर्चाचा तपशील मागितला असता ते देऊ शकले नाही. ग्रामसभेत मागासवर्गीयांसाठी असलेला निधीची कामे का घेतले नाही, यासह गावातील विविध प्रश्नांबाबत विचारणा केली असता थोरात व सत्ताधारी विखे समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद वाढत गेल्याने एकमेकावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने अखेर ग्रामसभा गुंडाळण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी जोर्वे गावात घडली.
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील जोर्वे गावात काल शुक्रवारी (दि. 30) सकाळी 10 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच प्रीती गोकुळ दिघे, उपसरपंच बादशा बोरकर, ग्रामसेवक बाजीराव पवार यासह सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला ग्रामसेवक बाजीराव पवार यांना निधीच्या खर्चाबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता ते त्यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत विचारणा केली.
जोर्वे गावात ग्रामसभा बोलवण्यात आली होती. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरे दिली जात होती. गावातील विविध विकास कामांच्या खर्चावरून दोन गटातील वाद वाढत गेल्याने शादिक बाचाबाची झाली. हा वाद वाढत गेल्याने अखेर ग्रामसभा गुंडाळण्यात आली.
बाजीराव पवार ग्रामसेवक जोर्वे
ग्रामपंचायतीला गावाच्या विकासासाठी शासन निधी देत असते, जोर्वे गावात गेली अडीच वर्ष या निधीचा संपूर्णपणे गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी जाब विचारण्यासाठी काही ग्रामस्थ एकत्र आलेले दिसले. परंतु सरपंचांकडे याचे उत्तरच नसल्याने सत्ताधार्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रकार वाढला. यामुळे प्रश्न विचारणार्यांनाच दम देणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झाले. जोर्वे गावात झालेल्या कामांचा तपशील मागितला असता अनेक संशय वाढविणारे विषय बाहेर निघायला सुरुवात झाली. यामुळे सत्ताधारी विखे व विरोधी थोरात कार्यकर्ता, पदाधिकार्यांमध्ये वादावादी वाढली. हा वाद वाढत गेल्याने हमरीतुमरी झाली.
प्रश्न विचारणार्याची गच्ची पकडणे, लोटून देणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे, असे प्रकार सुरू झाले, पण सामान्य जनतेला एकाही प्रश्नाचे उत्तर भेटले नाही.
ग्रामसेवकांनाही प्रश्न विचारण्यात आले, त्याचे उत्तर त्यांना देता येत नव्हते. शेवटी ग्रामस्थांनी सर्वच सदस्यांना धारेवर धरले तर उपसरपंच व सदस्यांनीही त्यांची हतबलता बोलून दाखवली. ग्रामपंचायतीने कोणते साहित्य खरेदी केले, याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळू शकली नाही. आलेला निधी कुठे वापरला जातो हेही कळून दिले जात नाही, वेगळाच माणसाच्या नावाने अकाउंट काढून त्यावर निधी वर्ग काढून तोही पैसा लंपास केला जातो, छोट्या कामांची मोठी बिले काढण्यात आल्याचेही आरोप झाले.
जोर्वे गावात गेली 40 वर्ष जे कधीही घडले नाही, ते शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत घडल्याने संपूर्ण तालुक्यातच हा चर्चेचा विषय झाला. शिव्या, भांडणे, मारामार्यानी संपूर्ण गाव हादरून गेले.
यावेळी सुरेश थोरात, सत्यजित थोरात, हर्षल काकड, उपसरपंच बादशहा बोरकर, संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर, भाऊसाहेब दिघे, बालम भवर, माणिकराव यादव, राजू थोरात, रमेश दिघे, अक्षय दिघे, विठ्ठल काकड, पंढरीनाथ बलसाने, गगन थोरात, डॉ. पवन काकड, अजित थोरात, शुभम दिघे, शांताराम दिघे, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, कैलास क्षीरसागर,जीवन काकड, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब काकड, संदीप यादव,दत्तू नाना काकड.शुभम दिघे, व इतर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला सत्ताधार्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने अखेर वाद वाढत गेल्याने दुपारच्या समाज ग्रामसभा गुंडाळण्यात आली.