'आगडगाव, शिराळ चिचोंडी धार्मिक स्थळांच्या रस्त्यांसाठी निधी द्या'

आमदार शिवाजी कर्डिले यांची केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी
Ahilyanagar News
'आगडगाव, शिराळ चिचोंडी धार्मिक स्थळांच्या रस्त्यांसाठी निधी द्या' Pudhari
Published on
Updated on

नगर तालुका: पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील गुरू आनंद तीर्थ व नगर तालुक्यातील भैरवनाथ देवस्थानच्या रस्त्यांसाठी सीआरएफ फंडांतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरीव निधीची मागणी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ हे जैन धर्माचे राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांचे जन्मस्थान आहे. त्यामुळे वर्षभर देशभरातून भाविक येथे येतात, तसेच आगडगाव येथील कालभैरवनाथ देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला येत आहे.

Ahilyanagar News
Nitin Gadkari : ‘सुरत-चेन्नई’मुळे होईल औद्योगिक विकास : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

त्यामुळे या दोन्हीही ठिकाणी वर्षभर भाविकांची रीघ असते, म्हणून या तीर्थस्थळांना जोडणारे रस्ते उच्चदर्जाचे व दुपदरी असावेत. जेणेकरून महामार्गांवरून या तीर्थस्थळांकडे जाणार्‍या भाविकांना कुठलीही अडचण येणार नाही. यासाठी आमदार कर्डिले यांनी खोसपुरी ते चिचोंडी शिराळ, जेऊर ते चिचोंडी शिराळ व भुईकोट किल्ला ते आगडगावमार्गे मिरी या रस्त्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भरीव निधीची मागणी पत्राद्वारे केली आहे.

या रस्त्यांसाठी लवकरच निधीची तरतूद करून ही कामे मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन मंत्री गडकरी यांनी यावेळी दिले. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी व नगर या तालुक्यातून जाणारा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग या रस्त्याचे केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली आहे.

Ahilyanagar News
शिर्डी, शनिशिंगणापुरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट!

परंतु या भूसंपादनाचा कोणताही मोबदला अद्यापपर्यंत संबंधित शेतकर्‍यांना मिळाला नाही. या रस्त्यांतर्गत येणार्‍या शेतजमिनीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शिक्के पडल्यामुळे शेतकर्‍यांना या जमिनी बाबत कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे करता येत नाहीत. त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत सापडले आहेत, म्हणून निवाड्यांप्रमाणे शेतकर्‍यांना मोबदला मिळण्यासाठी प्रशासनाला आदेश व्हावेत, अशी विनंती आमदार कर्डिले यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news