

नगर : श्रीरामपूर ते पुणे असा खासगी मोटारीने प्रवास करणार्या 23 वर्षीय तरुणीस पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्या अत्याचार केला. ही घटना रविवारी(दि. 26) पुणे रस्त्यावरील चास शिवारातील एका लॉजवर घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमद हसन सय्यद (रा. न्यू इंग्लिश स्कुल मार्ग, खंडाळा, ता. श्रीरामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शून्य क्रमांकाने गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पीडित तरुणी श्रीरामपूर येथील असून नोकरीनिमित्त पुणे येथे राहते. आरोपी काही वर्षांपूर्वी तिच्या वर्गात होता. त्यामुळे दोघांची ओळख होती. सोशल मीडियावर ते एकमेकांच्या संपर्कात होेते. नातेवाईकाच्या लग्नाकरिता श्रीरामपूरला आली होती. पुण्याला जाण्यासाठी बसस्थानकात गेली असता आरोपी तिथे आला. पुण्याला चाललो आहे असून, माझ्या मोटारीत चल असे म्हणाला. ओळखीचा असल्याने तरुणी मोटरीत बसली. तिला मळमळत असल्याने आरोपीने तिला पाणी दिले. त्यानंतर तिला चक्कर आली.
तीने आरोपीला मोटार थांबविण्यास सांगितली. आरोपीने लॉजवर थांबू तिथे फ्रेश होऊ असे म्हणाला आणि मोटारकार चास शिवारात लॉजवर थांबविली. आरोपी अहमदने तिला पुन्हा पाणी पिण्यास दिले. तिला पुन्हा चक्कर येऊ लागली. त्यानंतर आरोपी तिच्याशी लगट करू लागला. तिने विरोध केला पण गुंगीत असल्याने तिचा प्रतिकार कमी पडला. याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरुणीने नातेवाईकांना सर्व प्रकार सांगितला आणि पोलिस ठाणे गाठले.