Smart TOD Meter: स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत; पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन

महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे.
Smart Meter
स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत; पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहनFile Photo
Published on
Updated on

नगर: स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळत असून महावितरणकडून एजन्सीच्या माध्यमातून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

सोबतच रूफ टॉप सोलर उभारणार्‍या ग्राहकांना आवश्यक असणारे नेट मीटरसुद्धा मोफत लावण्यात येत आहेत. मीटरसाठी कुठल्याही शुल्काची मागणी केल्यास तक्रार करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहे.  (Latest Ahilyanagar News)

Smart Meter
Jejuri Development: जेजुरी विकास आराखड्यातील कामे तत्काळ पूर्ण करा; विजय शिवतारे यांचे निर्देश

त्यामुळे या नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड ग्राहकांवर नाही. घरगुती ग्राहकांकडे टीओडी मीटर असल्याशिवाय त्यांना दिवसाच्या वीजदरात असलेल्या सवलतीचा लाभ घेता येणार नाही.

त्यामुळे सदर टीओडी मीटर आणि रूफ टॉप सोलर उभारणार्‍या ग्राहकांना आवश्यक असणार्‍या नेट मीटर लावण्यासाठी कुणाकडूनही शुल्काची मागणी झाल्यास देऊ नये. यासंदर्भात ग्राहकांनी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा अथवा तक्रार करावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news