अहिल्यानगर : बँकेत बनावट सोने तारण ठेवून पावणेआठरा लाखांची फसवणूक

चार जणांवर गुन्हा दाखल
Ahilyanagar bank fraud
बँकेत बनावट सोने तारण ठेवून पावणेआठरा लाखांची फसवणूक file photo
Published on
Updated on

जामखेड : कॅनरा बँक जामखेड शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून तब्बल १७ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बँकेचे मॅनेजर आनंद डोळसे यांनी संबंधित चार जणांविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपींनी गोल्ड व्हॅल्युअर (सोने तपासणी अधिकारी) याच्याशी संगनमत करून बनावट दागिने तारण ठेवले होते. हे प्रकरण १३ मार्च २०२५ रोजी कॅनरा बँकेच्या नाशिक येथील क्षेत्रीय कार्यालयातर्फे पाठविण्यात आलेल्या स्वतंत्र व्हॅल्युअरने तपासणी करताना उघडकीस आले. मुनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलनी), अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ), व दिगांबर उत्तम आजबे (रा. आजबे वाडा, मेन रोड) यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स, जामखेड) याच्यावर फसवणुकीत सहभागी असल्याचा आरोप आहे.

संशयित आरोपींनी एकूण ३९५.९ ग्रॅम वजनाचे बनावट दागिने खरे असल्याचे भासवून बँकेत तारण ठेवले होते. त्या बदल्यात संबंधित खातेदारांनी १७ लाख ७३ हजारांची कर्जरक्कम घेतली होती. ही रक्कम त्यांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करून नंतर त्यांनी काढून घेतली. यातील दोन कर्ज प्रकरणे बँकेच्या माजी मॅनेजर पूजा शर्मा आणि अधिकारी सुनील बारसे यांच्या कार्यकाळात मंजूर झाली होती, तर तिसरे प्रकरण सद्य मॅनेजर आनंद डोळसे यांच्या काळात मंजूर झाले. याप्रकरणी पुढील तपास जामखेड पोलिस निरीक्षक महेश पाटील करत आहेत

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, तारण ठेवलेले बनावट दागिने पुढीलप्रमाणे आहेत :

मुनावर पठाण: 100 ग्रॅम (4 बांगड्या, 4 अंगठ्या)

अनिता जमदाडे: 152.200 ग्रॅम (2 बांगड्या, 5 अंगठ्या)

दिगांबर आजबे: 143.700 ग्रॅम (बांगड्या, कडे, ब्रेसलेट, अंगठ्या)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news