Nagar: जिल्ह्यात 99 गावांत निवडणुकीची धामधूम; एप्रिल-मेमध्ये निवडणुकीची शक्यता

मतदारयादी कार्यक्रम जाहीर; अंतिम यादी 26 मार्चला
Voting
जिल्ह्यात 99 गावांत निवडणुकीची धामधूम; एप्रिल-मेमध्ये निवडणुकीची शक्यताFile Photo
Published on
Updated on

नगर: जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या दोन वर्षांत मुदत संपलेल्या 99 ग्रामपंचायतींच्या मतदारयादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 26 मार्च 2025 रोजी या ग्रामपंचायतींची अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.

यामध्ये राशीन, हरेगाव, पिंपळस, घारगाव, बुरुडगाव, नेवासा बु., घोडेगाव, तामसवाडी, टाकळी मानूर, मांडवगण, हाळगाव, पारगाव भातोडी आदी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एप्रिल- मे महिन्यात 99 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षात 84 ग्रामपंचायतीचा कालावधी संपलेला आहे. या ग्रामपंचायतींवर सध्या गेल्या वर्षापासून प्रशासक नियुक्त आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात 15 ग्रामपंचायतींचा कालावधी संपणार आहे.

2024 वर्षातील 84 ग्रामपंचायतींची अतिम प्रभागरचना प्रसिध्द होऊन प्रभागनिहाय आरक्षण देखील प्रसिध्द झालेले आहे. 2025 मधील 15 ग्रामपंचायतींची प्रभागरचना पूर्ण होऊन 11 मार्च रोजी आरक्षण सोडत झालेली आहे. .

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील 99 ग्रामपंचायतींच्या मतदारयादीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार 19 मार्च 2025 रोजी या ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.

या यादीवर 19 ते 24 मार्च 2025 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती व सूचना निकाली काढल्यानंतर 26 मार्च 2025 रोजी 99 ग्रामपंचायतींची अंतिम मतदारयादी प्रसिध्द होणार आहे.

अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतर एप्रिल-मे महिन्यात या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन उन्हाच्या कडाक्यात 99 ग्रामपंचायतींचे राजकीय वातावरण तापणार आहे.

महत्वपूर्ण ग्रामपंचायती

राशीन, हरेगाव, पिंपळस, घारगाव, बुरुडगाव, निंबोडी, नेवासा बु., घोडेगाव, भामाठाण, कुमशेत, खडकी खुर्द, धामोरी, शिरसगाव, सारोळे पठार, भामाठाण, मोकळ ओहळ, बेलपांढरी, तामसवाडी, महालक्ष्मीहिवरे, मंगरुळ खुर्द, बुद्रूक, सालवडगाव, टाकळी मानूर, अंबिकानगर, चुंभळी, हाळगाव, धनेगाव, देशमुखवाडी, अंबिकानगर, माही, पारगाव भातोडी, भोयरे पठार, बुद्रूक व खुर्द, जळगाव, मांडवगण, नान्नज दुमाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news