Crime News : चास शिवारात वाहनचालकास लुटले

दोन अल्पवयीन मुलांसह तिघांना पकडले
44 people were fooled by the lure of jobs
वाहनचालकास लुटलेfile photo
Published on
Updated on

वाळकी : रात्रीच्या वेळी वाहनचालकाला रस्त्यात अडवून मारहाण करीत लुटण्याची घटना नगर- पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारातील पेट्रोल पंपासमोर 19 मार्चला रात्री 11.45 वाजता घडली. नगर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत केडगाव येथील तीन आरोपींना पहाटे पकडले. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

याबाबत तौफिक शरीफ अन्सारी (वय 29, रा. झारखंड) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली..अन्सारी 19 मार्चच्या रात्री 11.45 वाजता कंटेनर (क्र. एमएच 43 सी ई 3961) घेऊन पुण्याहून नगरच्या दिशेने येत होते. चास शिवारात मोटारसायकल (क्र. एमएच 16 डी ई 4977) व एका मोपेडवर तीन अनोळखी तरुण आले. त्यांनी कंटेनरला दुचाक्या आडव्या लावून कंटेनर थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर तिघांनी चालक तौफिक अन्सारी यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील सात हजारांची रोकड, तसेच कागदपत्रे ठेवलेली बॅग हिसकावून घेत पसार झाले. जाताना त्यांनी कंटेनरच्या काचा दगडाने फोडल्या.

या घटनेनंतर कंटेनर चालकाने पेट्रोलपंपावर जावून तेथील कर्मचार्‍यांच्या मदतीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड व पोलिस पथकाने घटनास्थळी आले. हा गुन्हा केडगाव येथील तिघांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी केडगाव येथील सनी मच्छिंद्र धोत्रे (वय 19) व त्याचे शाहूनगर येथे राहणारे 2 अल्पवयीन साथीदारांना पहाटे पकडले. याबाबत कंटेनर चालक तौफिक अन्सारी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news