Jamkhed Dance Artist Death: नृत्यगण दिपाली पाटील गळफास घेत आत्महत्या

तपनेश्वर भागातील हॉटेल लॉजमध्ये 35 वर्षीय नृत्यांगना मृतावस्थेत आढळली; आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिस तपास सुरू
Dance Artist Death
Dance Artist DeathPudhari
Published on
Updated on

जामखेड: जामखेड शहरातील तपनेश्वर भागात मैत्रीणींन सोबत रहाणारी नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील हीने खर्डा रोड वरील एका हॉटेलच्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. नृत्यांगना हीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Dance Artist Death
Jamkhed Municipal Election 2025: जामखेडचा पहिला नगराध्यक्ष कोण? मतदानानंतर चर्चांना उधाण

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत नृत्यांगना दिपाली गोकुळ पाटील, वय 35 वर्षे रा. तपनेश्वर गल्ली. (मुळ रा. कल्याण, जिल्हा. ठाणे) ही जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करीत होती. सध्या ती आपल्या इतर मैत्रीणी सोबत तपनेश्वर भागात भाड्याने रुम करुन रहात होती.

Dance Artist Death
Reserved Fund Issue Ahilyanagar: राखीव 15% निधी न वापरल्याचा आरोप — आंबेडकर भवन दुरुस्तीची मागणी तीव्र

आज गुरुवार दि 4 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या रुम मधिल मैत्रीणींना मी बाजारात जाऊन येते असे दिपाली हीने सांगितले व बाहेर निघुन गेली. दुपारी बराच वेळ होऊनही ती परत आली नसल्याने तीच्या मैत्रीणींनी दिपाली हीस फोन करुन संपर्क केला मात्र तीचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तीच्या मैत्रीणींनी ती ज्या रीक्षाने गेली त्या रीक्षावाल्यास विचारले असता त्याने सांगितले की मी दिपाली हीस खर्डा रोडवरील हॉटेल साई लॉज या ठिकाणी सोडले आहे.

Dance Artist Death
Sambhajinagar Highway Garbage Issue: छत्रपती संभाजीनगर महामार्ग कचऱ्याच्या विळख्यात — दुर्गंधीने नागरिक त्रस्त

यानंतर तीच्या मैत्रीणी साडेपाच वाजता हॉटेल मधिल लॉजकडे गेल्या असता लॉजच्या रुमला आतुन लॉक केले होते. यानंतर वेटरने दुसर्‍या चावीने रुमचा दरवाजा उघडला असता दिपाली गोकुळ पाटील हीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसुन आले. यानंतर घटनास्थळी पोलिस व इतरांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जामखेड ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

Dance Artist Death
Pratappur Leopard Attack: प्रतापपूरमध्ये बिबट्याचा थरार — शेतकऱ्यावर झडप, थोडक्यात बचाव

कलाकेंद्रात नृत्यांगना म्हणून काम करीत असलेल्या दिपाली हीने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजु शकले नाही. याप्रकरणी तिची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हीने दिलेल्या खबरी वरुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news