Ahilyanagar Crop Insurance: जिल्ह्यात 118 कोटींचा पीकविमा मंजूर; सोयाबीनला सर्वाधिक भरपाई

2.23 लाख शेतकऱ्यांना दिलासा; कापूस व कांदा पिकांच्या नुकसानभरपाईची गणना अद्याप सुरू
Crop Insurance
Crop Insurance Pudhari
Published on
Updated on

नगर: 2025 मधील खरीप हंगामी पिकांसाठी 118 कोटी 63 लाख 64 हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झालेला आहे. यामधील सर्वाधिक 109 कोटी 73 लाख रुपयांचा विमा सोयाबीन पिकाला मंजूर झाला. काही तालुक्यांतील कापूस व कांदा पिकांच्या नुकसानभरपाईची परिगणना अद्याप सुरू आहे. त्यामुळे पीकविमा मंजुरीच्या रक्कमेत आणखी वाढ होणार आहे.

Crop Insurance
Jamkhed ACB Bribery Case: जामखेड नगरपरिषदेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व कंत्राटी मदतनीस एसीबीच्या जाळ्यात

जिल्ह्यात प्रधानमंत्री पिकविमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबवण्यात आली. या योजनेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, गहू, उडीद, बाजरी, तूर, कांदा व भुईमूग आदी खरीप पिकांचे दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग आदी कारणामुळे नुकसान झाल्यास ही कापणीप्रयोग आधारित येणाऱ्या उत्पन्नानुसार नुकसान भरपाई देय होते. भात, सोयाबीन, कापूस व गहू या पिकांसाठी तांत्रिक उत्पन्नास पन्नास टक्के भरांकण आहे.

Crop Insurance
Ashok Kharat: शिर्डी जमीन घोटाळ्यात भोंदू खरातचा अजब दावा; साडेपाच कोटींच्या व्यवहारावरून चौकशी तीव्र

खरीप हंगाम सन 2025 मध्ये जिल्ह्यात 2 लाख 23 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवित 2.39 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविला होता. आतापर्यंत पीकविम्यापोटी जिल्ह्यासाठी 118 कोटी 63 लाख 64 हजार रुपये मंजूर झालेले आहेत. काही तालुक्यांतील भरपाईमध्ये कापूस व कांदा या पिकांतील भरपाई रकमेचा समावेश नाही. अद्याप ती परिगणना प्रगतीपथावर आहे. कापूस व कांदा पिकांचे नुकसान भरपाई परिगणना करणे सुरू आहे.

Crop Insurance
Ahilyanagar Dam Water Storage: जिल्ह्यात धरणांमध्ये 46 टक्के पाणीसाठा; पावसाळा लांबल्यास पाणी कपातीचे संकट

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कृषि, ग्रामविकास व महसूल या तीनही शासकीय विभागांनी समन्वयाने पीक कापणी प्रयोगाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी केल्याने खरीप हंगामातील झालेल्या पीक नुकसानपोटी भरपाई मिळाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

पीकनिहाय मंजूर रक्कम (लाखांत)

  • उडीद: 619.932,

  • मूग: 158.163,

  • भुईमूग: 20.674,

  • कांदा: 28.105,

  • बाजरी: 12.146,

  • तूर: 51.427,

  • सोयाबीन: 10973.21

Crop Insurance
Illegal Sex Determination Racket Busted: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश; श्रीरामपूरपर्यंत धागेदोरे, डॉक्टरसह 5 जण अटकेत

मंजूर पीकविमा रक्कम तालुकानिहाय

  • नगर : 503.962, अकोले: 117.043, जामखेड: 1771.624,

  • कर्जत: 0.895, कोपरगाव: 966.336, नेवासा: 2268.817,

  • पारनेर: 2172.648, पाथर्डी: 140.029, राहाता: 1392.7110,

  • राहुरी: 624.9511, शेवगाव: 107.9112, श्रीरामपूर: 1796.75.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news