

नगर: सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने नऊ तालुक्यांतील 423 हेक्टर क्षेत्रावरील कांदा, बाजरी, टोमॅटो, शेवगा, लिंबू, भाजीपाला तसेच आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, पपई, पेरु आदी फळबागांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या 356 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या नुकसानीचा आर्थिक फटका 52 गावांतील 946 शेतकर्यांना बसला असल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. (Ahilyanagar News update)
सोमवारी वादळी वार्यासह झालेल्या पावसाचा दणका अहिल्यानगर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा, शेवगाव, संगमनेर व अकोले या तालुक्यांतील 52 गावांना बसला आहे. अकोले तालुक्यातील 18 गावांतील 153.75 बाजरी, डाळिंब व भाजीपालाचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यातील 12 गावांतील 123.12 हेक्टर क्षेत्रावरील बाजरी, कांदा, टोमॅटो, लिंबू, झेंडू आणि निमोणीचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने प्राथमिक नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला असून, 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिके आणि फळबागांना शासनाकडून हेक्टरी अनुदान दिले जात आहे. याबाबत लवकरच नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.
हेक्टरी नुकसान कंसात शेतकरी संख्या
अहिल्यानगर : 1 (2)
पाथर्डी : 60.9 (88)
कर्जत : 50.30 (62)
श्रीगोंदा : 13 (35)
जामखेड : 10 (12)
नेवासा : 7.80 (12)
शेवगाव : 3.20 (4)
संगमनेर : 123.12 (303)
अकोले : 153.75 (428)