Congress Appointments: काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर; राहुरीचे तालुकाध्यक्षपद मात्र रिक्त

काँग्रेसने अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. राहुरी तालुकाध्यक्षपद रिक्त असून निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे.
Congress
CongressPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: काँग्रेस पक्षाने दक्षिण जिल्ह्यातील तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. राहुरी तालुकाध्यक्ष पदाची जागा रिक्त असून त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष (दक्षिण) किरण अण्णासाहेब पाटील यांनी माध्यमांना दिली. पारनेर, कर्जत, जामखेडला शहर व तालुका असा विचार करण्यात आलेला नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या सहीने तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

Congress
Shrirampur Accident: तिचे प्रसंगावधान मृत्यूला पराजित करते तेव्हा...भरधाव ट्रकने उडवले आणि स्कूटीवरून उडूनही तिने हिमतीने वाचवला जीव

‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन काँग्रेसचे निरीक्षक राजाराम पानगव्हाणे यांनी इच्छुकांशी संवाद साधला.

या प्रक्रियेदरम्यान इच्छुकांच्या संघटनात्मक कार्याचा, अनुभवाचा तसेच पक्षातील योगदानाचा आढावा घेतल्यानंतर या नियुक्त्या करण्यात आल्याचे किरण पाटील यांनी सांगितले.

निरीक्षक पानगव्हाणे यांच्या मुलाखतीनंतर प्रत्येक तालुक्याचा सविस्तर अहवाल तयार करून तो प्रदेश समितीकडे पाठविण्यात आला. त्या आधारे या नियुक्त्या करण्यात आल्या.

Congress
Jamkhed Robbery Gang: जामखेडमध्ये दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश; पाच जण ताब्यात, आठ घरफोडींची उकल

नवे शिलेदार

पारनेर : ईश्वर सीताराम दिवटे

कर्जत : दिलीप कल्याणराव काळदाते

जामखेड : कुंडल सोपान राळेभात

पाथर्डी : प्रकाश विठ्ठलराव शेलार

पाथर्डी शहर : आनंद जगन्नाथ सानप

शेवगाव : सुधीर हरिभाऊ बाबर

शेवगाव शहर : धनंजय नारायण ढाकणे

श्रीगोंदा : संतोष पांडुरंग भोईटे

श्रीगोंदा शहर : ॲड. समीत सयाजी बोरुडे

राहुरी शहर : ऋषिकेश रावसाहेब तनपुरे

अहिल्यानगर तालुका : भरत साहेबराव बोडखे

भिंगार : श्यामराव देविदास वाघस्कर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news