Prostitution Racket: वेश्याव्यवसाय करणार्‍या रॅकेटचा शहर पोलिसांनी केला पर्दाफाश

दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
Prostitution Racket
वेश्याव्यवसाय करणार्‍या रॅकेटचा शहर पोलिसांनी केला पर्दाफाशPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: शहरातील एका लॉजवर वेश्याव्यवसाय करणार्‍या रॅकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. याठिकाणाहुन दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

अप्पर पोलिस अधिक्षक जयदत्त भवर यांना शहरातील आदर्श लॉज येथे अनाधिकृतरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहीती मिळाली. त्यांना मिळालेल्या माहीतीवरुन शहर पोलिसांनी आदर्श लॉज येथे जाऊन छापा टाकला. (Latest Ahilyanagar News)

Prostitution Racket
Ganja Cultivation: शेतात गांजाच्या झाडांची लागवड; 86 झाडे जप्त

सदर ठिकाणी धिरज प्रमोद बिंगले (वय 35, रा. रंगोलीगल्ली वार्ड नं.5, श्रीरामपूर) व त्याचा मॅनेजर अहमद शेख हे स्वतः आर्थिक फायद्यासाठी पिडीत महीलांना देहविक्री करण्यास भाग पाडत असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईमध्ये तीन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी आदर्श लॉजचा मॅनेजर धिरज प्रमोद बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख (रा. श्रीरामपुर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये धिरज प्रमोद बिंगले यास अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

Prostitution Racket
Stray Dog Catching: मोकाट कुत्री पकडण्यासाठी शहरात फिरणार चार वाहने; महापालिका आयुक्तांची माहिती

सदरची कारवाइ पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, राम शिखरे, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, आप्पासाहेब हंडाळ, दादाभाई मगरे, दिपक मेढे, अजीत धाराव, आजीनाथ आंधळे, अंबादास आंधळे, सचिन दुकळे, आदींनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news