

Chief Minister Devendra Fadnavis releases special postal cover
जामखेड : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे मंत्री परिषद बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्रिमंडळ सदस्य आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे विभागाचे टपाल सेवा संचालक अभिजीत बनसोडे यांनी यातील पहिला अल्बम मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
टपाल विभागाने प्रकाशित केलेल्या या विशेष टपाल आवरणाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.