गाई-गुरांचा गोठा नव्हे, हा तर बस थांबा!

जनावरे बांधणार्‍यावर महापालिकेतर्फे गुन्हा
nagar news
गाई-गुरांचा गोठा Pudhari
Published on
Updated on

बंगाल चौकी परिसरात बसथांब्याच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणार्‍या मालकाविरुद्ध महापालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. बंटी श्रीनिवास वायकर (रा. बंगाल चौकी) असे त्याचे नाव आहे.

रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणार्‍या व महापालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानणार्‍या, जनावराच्या मालकांवर यापुढे असे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

बंगाल चौकी परिसरात बसथांब्यावर व रस्त्यावर सातत्याने जनावरे बांधली जातात. या ठिकाणी जनावरांना नुकसान पोहचवणार्‍या घटनाही वारंवार घडल्या आहेत. महापालिकेने सदर जनावरांच्या मालकांवर यापूर्वीही कारवाई केली आहे. मात्र महापालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर जनावरे बांधली जात असल्याने अखेर महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलत सदर जनावरांच्या मालकावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे आपल्या स्वतःच्या जागेत सुरक्षित ठिकाणी बांधावीत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, इतर नागरिकांना त्रास होईल, उपद्रव होईल अशा पद्धतीने रस्त्यावर जनावर बांधू नयेत. अन्यथा महापालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास जनावरांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news