

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात विना परवाना डुकरे पाळून त्यांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मोकाटपणे सोडून शहरातील नागरीकांना त्रास होवून, सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण केला. याबाबत डुकरं पाळणार्या 16 जणांविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोकाट डुकरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते, अशा तक्रारी आल्याने श्रीरामपूर नगरपालिकेने शहरातील डुक्कर पाळणार्या 16 जणांना नोटीसा दिल्या. (Latest Ahilyanagar News)
याबाबत सार्वजनिक ठिकाणी डुक्कर न सोडण्याचे कळविले होते, परंतू वारंवार पालिकेने नोटीसा देवूनही मालकांनी शहरात मोकाट डुकरं सोडली. मानवी जिवीतास धोका निर्माण होवून, उपद्रव निर्माण होऊ शकतो, हे माहीत असताना डुकरं मोकाट सोडण्या आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय बबन आरणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
कैलास म्हस्के, विक्की पवार, देवा चावरीया, तुकाराम राजाराम गायकवाड, राजू सुखबिर बिडलॉन, किशोर पापा झिंगारे, भास्कर गायकवाड, दिलीप . गायकवाड, सिद्धार्थ अर्जुन लोहरे, दिलीप फुलारे, अतुल फुलारे, अशोक तुकाराम गायकवाड, अवी गायकवाड, अमोल तुकाराम शिंदे, गोरख गायकवाड व ऋतिक शिवाजी गायकवाड यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.