Bolhegaon Drainage Project: बोल्हेगावात पावसाळी पाणी निचऱ्यासाठी ९०० मिमी पाईपलाईनचे काम सुरू; पोलिस बंदोबस्तात अंमलबजावणी

शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही महानगरपालिकेची कारवाई; सीना नदीत पावसाचे पाणी सोडण्याची व्यवस्था
Bolhegaon Drainage Project
Bolhegaon Drainage ProjectPudhari
Published on
Updated on

नगर: बोल्हेगाव परिसरात पावसाळ्यात पावसाचे पाणी साचल्याने गटारी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसत होते. त्यासाठी ९०० मिमी व्यासाची पाईनलाईन करून पावसाचे पाणी थेट सीना नदीत सोडण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध केला.

Bolhegaon Drainage Project
Maratha Reservation Benefits: मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शैक्षणिक सवलतींसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मात्र, त्यांना कायदेशीर नोटिसा देवून पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्यात आले आहे. यंदा यंदाच्या पावसाचे पाणी थेट सीना नदीत जाणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील बोल्हेगाव परिसरात नागरिकांच्या दीर्घकालीन हितासाठी ९०० मिमी व्यासाच्या पावसाळी गटाराचे नवीन डीपी रस्त्यालगत बांधकाम करणे अत्यावश्यक होते.

Bolhegaon Drainage Project
Anti Superstition Movement: अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नगरमध्ये बुवाबाजी विरोधी संघर्ष फेरी; राज्यभरातून ३५० पदाधिकारी सहभागी

या कामामुळे पावसाचे पाणी जलद गतीने वाहून जाण्यास मदत होणार असून परिसरातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या कामासाठी काही शेतकऱ्यांकडून विरोध केला. संबंधित शेतकऱ्यांशी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे यांनी चर्चा केली.

Bolhegaon Drainage Project
Kadgaon Storm Tragedy: कडगावमध्ये वादळाचा कहर; घर कोसळून महिलेचा मृत्यू, सहा जण जखमी

मात्र, तरीही शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त मुक्तेकर, शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनिअर आदित्य बल्लाळ यांच्यासह पोलिस पथक उपस्थित होते.

Bolhegaon Drainage Project
Fetal Determination Case: पिंपरी निर्मळ गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी एकाला अटक; आरोपींची संख्या १९ वर

आज सुमारे ४० मीटर काम पूर्ण करण्यात आले. या पाईपलाईनमुळे बोल्हेगावातील राघवेंद्र स्वामी मंदिर परिसरात आणि शाळेच्या परिसरात पावसाचे साचणारे पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news