Rahuri Politics: राहुरीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी लढत?

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत होते. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेत मनधरणी केली.
Rahuri Politics
Rahuri PoliticsPudhari
Published on
Updated on

राहुरी: भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या रिक्त जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी राष्ट्रवादीने गोविंद मोकाटे हा नवखा चेहरा समोर केला. भाजपने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत होते. मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेत मनधरणी केली. त्यानंतर त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

Rahuri Politics
Parner Onion Farmers Crisis: पारनेरमध्ये कांद्याला कवडीमोल भाव; शेतकरी आर्थिक संकटात

तनपुरे निवडणूक रिंगणात असते तर लढत तुल्यबळ झाली असती, पण ते थांबले तरी राष्ट्रवादीने मोकाटे यांना उमेदवारी देत भाजपचे बिनविरोध निवडणुकीचे मनसुबे हाणून पाडले. या दोन प्रमुख उमेदवारांशिवाय काही अपक्षांनीही अर्ज दाखल केले आहेत. 9 तारखेपर्यंत माघार घेण्याची मुदत असल्याने त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news