भंडारदरा धरणात ८८२० दघनफुट तर निळवंडे धरणात २७७४ दघनफुट पाणी साठा

निळवंडे धरणातून पिण्याचे पाणी व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी ५५० ने विसर्गात वाढ
Bhandardara dam
भंडारदरा धरण Pudhari
Published on
Updated on

अकोले : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेल्या भंडारदरा धरणात ८८२० दशलक्ष घनफुट तर निळवंडे धरणात २७७४ दशलक्ष घनफुट पाणी साठा उपलब्ध आहे. तर निळवंडे धरणातून १२ एप्रिल रोजी रब्बी चे दुसरे आवर्तनासाठी पाणी सोडण्यात आले होते. हे आवर्तन कायम ठेवत ५५० ने विसर्ग वाढवत निळवंडे धरणातून दि.१० मार्च रात्री ८ वाजता १७०० क्युसेकने पाणी पिण्याबरोबरच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहेत.

पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, भंडारदरा,निळवंडे, आढाळा धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षी समाधानकारक पाऊस पडला.तर मार्चच्या प्रारंभीच तालुका तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापासूनच आदिवासी परिसरासह शहरात उन्हाचा कडाका जाणवत असतानाच धरणांच्या पाणी पातळीतही झपाट्याने घट होत आहे.तर उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायी असलेल्या भंडारदरा धरणात ८ हजार ८२० दलघफू म्हणजेच टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

खरिप हंगामातील क्षेत्र

निळवंडे धरण लाभक्षेत्रात ६४.८० हेक्टर तर आढळा धरण लाभक्षेत्रात ४१८ हेक्टर

रब्बी हंगामातील क्षेत्र

भंडारदरा:- १३१.२० हेक्टर, निळवंडे :- १९५.५० हेक्टर, आढळा :- ५१० हेक्टर

गतवर्षी याच कालावधीत ५ हजार ३०९ दलघफू पाणी साठा शिल्लक होता. तर निळवंडे धरणात २ हजार ७७४ दशलक्ष घनफुट पाणीसाठा असुन गतवर्षी आजमितीस ३ हजार ४०१ दशलक्ष घनफुट पाणी साठा शिल्लक होता.आणि आढळा धरणात ७३६ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शिल्लक असुन गतवर्षी आजमितीस ७३६ दशलक्ष घनफुट पाणी साठा शिल्लक होता. तसेच हे आवर्तन सात सात दिवस चालणार आहेच. दरम्यान निळंवडे धरणांची खालावणारी पाणी पातळीही उत्तर नगर जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातचं दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. माळरान ओसाड झाले असून, विहिरी तळ गाठायला लागल्या आहेत.तसेच कळंब, मन्हाळे, मुथाळणे, देवठाण, केळी ओतूरच्या वाड्या आणि घोडेवाडी परिसरात दरवर्षी प्रमाणे पाणी टंचाई निर्माण होणार आहे. तर आदिवासी भागातील बहुतांश गावामध्ये विहिरीनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दुरवर भटकती करण्याची वेळ आदिवासी परिसरात आली आहे.

शिळवंडी :- १४३.५५ क्षमता ८३.४३ दशलक्ष घनफूट, सांगवी :-७१.२३ क्षमता २९.४३ दशलक्ष घनफूट, पाडोसी :- १४६ क्षमता ७१.६५ दशलक्ष घनफूट, अबित :- १९३ क्षमता ८९.९९ दशलक्ष घनफूट, देवहंडी:-१५५ क्षमता ६७.५५ दशलक्ष घनफूट, बलठण :- २०२ क्षमता १०४.२९ दशलक्ष घनफूट, कोथळे :- १८२ क्षमता १०५ दशलक्ष घनफूट, टिटवी:- ३०३.३२ क्षमता १९८.९६ दशलक्ष घनफूट, बोरी :-४७.८० क्षमता २६ .७१ दशलक्ष घनफूट, बदगी बेलापूर :- ९४.९८ क्षमता,२९.९३ दशलक्ष घनफुट, वाकी :-११२.६६ क्षमता ७५.१५ दशलक्ष घनफुट, पिंपळगाव खांड :- ६०० क्षमता २६०.२९ दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे.परंतु निळवंड्याच्या उजव्या व डाव्या कालव्यातुन सोडलेल्या पाण्यामुळे लाभ क्षेत्रात जरी आनंद असला तरी आदिवासी भागासह नंदीकाठच्या गावाना शेतीसह पिण्यासाठी पाण्याची समस्या भेडसावणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news