

विधानसभा निवडणुकीत माझे खरे प्रतिस्पर्धी हे शंकरराव गडाख असून मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता विजय निश्चित आहे. मिळणारा प्रतिसाद पाहून विठ्ठलराव लंघे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते भयभीत झाले असून त्यांना वेड लागले आहे, अशी खरमरीत टीका बाळासाहेब मुरकुटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
उमेदवारी कायम ठेवण्यासाठी गडाखांकडून पैसे घेतले किंवा निवडणुकीतून माघार घेऊन त्यांना राजकीय पाठिंबा जाहीर करणार असल्याच्या अफवा लंघे समर्थक पसरवित आहेत. त्यांच्या या भूलथापांवर मतदारांनी मुळीच विश्वास ठेवू नये असे आवाहन बाळासाहेब मुरकुटे यांनी केले आहे. बाळासाहेब मुरकुटे हे ‘प्रहार’कडूननिवडणूक लढवीत आहेत. माझ्याविषयी सुरू असलेला अपप्रचार बंद करा, अन्यथा दिलेल्या ÷उत्तरातून दोघांचीही पळताभूई थोडू करू असा इशारा मुरकुटे यांनी दिला. विरोधक सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट टाकत आहे. हा प्रकार बंद करा करा. मतदार, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर मिळणार प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहेत. गडाखांविरोधात एकास एक लढत होत असताना तिसरे उमेदवार विठ्ठलराव लंघे हे भयभीत झाले असून वेड लागल्यागत ते चुकीचे मेसेज पसरवित आहेत. जय हरि परिवार ही निवडणूक जिंकेल असा विश्वास व्यक्त करतानाच भयभीत, दहशत, दादागिरी, शेतकरी अन्याय आणि खुंटलेला विकास या प्रश्नांवर जनतेनेच निवडणूक हातात घेतल्याचे ते म्हणाले. विरोधकांच्या अफवावर विश्वास ठेवू नका, लक्ष देवूं नका, असे आवाहन मुरकुटे यांनी मतदारांना केले आहे.
जागा वाटपात नेवासा आश्चर्यकारकरीत्या शिंदे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व पालकमंत्र्यांनी संगनमताने विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी मिळवून दिल्याचा आरोप मुरकुटे यांनी पूर्वीच केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष असणारे लंघे थेट शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले, तेव्हापासून मुरकुटे भडकले असून ते वारंवार लंघेंवर तीव्र टीका करीत आहेत. दोघांतील वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार आ.शंकरराव गडाख मात्र पूर्णतः अलिप्त आहेत. कार्यकर्त्यांचे मोठे संघटन व सशक्त प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.