

कोळपेवाडी : आमदार आशुतोष काळे यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीमुळे या नेतृत्वावर विश्वास ठेवून, दुसर्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘इनकमिंग’ सुरुच आहे. शिवसेना (उबाठा गटाचे) तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, तर कोल्हे गटाचे जेऊर पाटोदा ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र गिते यांनी कोल्हे गटाला सोडचिठ्ठी देवून हातात घड्याळ बांधले आहे. (Ahilyanagar Latest News)
आमदार काळे यांनी कोपरगाव मतदार संघाचा केलेला विकास इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांनासुद्धा भावला आहे. यामुळे कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांचे राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात जोरात ‘इन्कमिंग’ सुरु आहे. आमदार काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील शिवसेना (उबाठा गट) तालुकाप्रमुखाने पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात आमदार आशुतोष काळे यांनी केलेला विकास नजरेत भरणारा आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांनी विकास गंगा पोहोचविली आहे.
अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत प्रवेश करीत असल्यामुळे कोपरगाव मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांची ताकद वाढत आहे. होवू घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काळे गटाला या पक्षांतराचा लाभ होणार असल्याचे राजकीय जाणकारांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आमदार आशुतोष काळे यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर केलेल्यांचे स्वागत केले.