Ashadhi Ekadashi ST Bus Service: आषाढी यात्रेनंतर परतीच्या प्रवासाला वेग; एसटीच्या बस भाविकांनी खचाखच भरल्या

अहिल्यानगर विभागाकडून ४३० जादा बसची व्यवस्था; तारकपूर बसस्थानकावर सहा दिवसांपासून वारकऱ्यांची प्रचंड गर्दी
Ashadhi Ekadashi ST Bus Service
Ashadhi Ekadashi ST Bus ServicePudhari
Published on
Updated on

नगर: आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्‍या अहिल्‍यानगर विभागाच्‍या वतीने पंढरपूर यात्रेला जाणार्‍या भाविकांसाठी जादा बसची व्‍यवस्‍था केली. शनिवारी (दि.२५) पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कळसाचे दर्शन घेऊन वारकरी परतू लागले आहेत. त्‍यामुळे महामंडळाच्‍या बस गर्दीने खचाखच भरुन येत आहेत. गेल्‍या सहा दिवसांपासून तारकपूर बसस्‍थानक भाविकांच्‍या गर्दीने फुलून गेले आहे.

Ashadhi Ekadashi ST Bus Service
Kalsubai Landslide: कळसुबाईच्या पायथ्याशी भीषण भूस्खलन; घर गाडले, ११ पशुधनांचा मृत्यू, २१ जणांचे स्थलांतर

पंढरपूर यात्रेसाठी अहिल्‍यानगर विभागाने ४३० जादा बसची व्‍यवस्‍था केली. त्‍यासाठी प्रत्‍येक आगारासाठी बसनिश्‍चित केल्‍या होत्‍या. बहुतांश बस तारकपूर बसस्‍थानकातून जात होत्‍या. सोमवारपासून पंढरपूर यात्रा सुरु झाली असून, भाविक या बसच्‍या माध्‍यमातून पंढरपूर यात्रेसाठी रवाना होत होते.

Ashadhi Ekadashi ST Bus Service
Jawaleshwar Rath Yatra: जवळेश्वर रथोत्सवाला आजपासून प्रारंभ; शतकाहून जुनी परंपरा अनुभवण्यासाठी भाविकांची गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त गेल्‍या दोन दिवसांपासून पंढरपुरात मोठी गर्दी झाली असून, गेल्‍या सहा दिवसांपासून तारकपूर बसस्‍थानक भाविकांच्‍या गर्दीने फुलून गेले आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन मिळणे अवघड असल्‍यामुळे भाविक कळसाचे दर्शन घेऊन दिंडीतील भाविक महामंडळाच्‍या बसने परतत आहेत. त्‍यामुळे दर्शनाहून परतणार्‍या भाविकांमुळे एसटी बस होऊसफूल धावू लागली आहे.

Ashadhi Ekadashi ST Bus Service
Bhojapur Dam Overflow: भोजापूर धरण ओव्हरफ्लो; म्हाळुंगी नदीला पूर, संगमनेरमध्ये साईनगरवासीयांना सतर्कतेचा इशारा

त्‍यामुळे तारकपूर बसस्‍थानक पंढरपूरला जाणार्‍या आणि येणार्‍या भाविकांनी फुलून गेले आहे. आणखी दोन तीन दिवस जादाबससेवा उपलब्‍ध असणार आहे. त्‍यामुळे तारकपूर बसस्‍थानकावर गर्दीही कायम असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news