Political News: शिवसेना नगरसेविका पूजा भोईर यांचे नगरसेवक पद रद्द; शिवसेनेला १५ दिवसात दुसरा मोठा धक्का

मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार सुरेखा पारधी यांचा सुमारे एक हजार मतांनी पराभव केला होता.
Political News
Political NewsPudhari
Published on
Updated on

उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेतील शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला असून नगरसेविका पूजा सचिन भोईर यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. त्या प्रभाग क्रमांक 1 मधील 'ब' जागेवर अनुसूचित जाती (SC) आरक्षणातून निवडून आल्या होत्या. मागील पंधरा दिवसात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार सुरेखा पारधी यांचा सुमारे एक हजार मतांनी पराभव केला होता.

Political News
Real Estate Investment: रिअल इस्टेटमधील खासगी गुंतवणुकीत २३ टक्क्यांची घट

मात्र, त्यांनी सादर केलेल्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या दाखला रद्द केल्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्त यांनी बुधवारी निर्गमित केले होते. त्यानंतर गुरुवारी तत्काळ पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पूजा भोईर यांचे नगरसेवक पद रद्द करीत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. पूजा भोईर यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वीही शिवसेनेचे नगरसेवक विकी लबाना यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवक संख्येत दोनने घट झाली असून पक्षाची संख्या आता ३६ वर आली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा पाठिंबा असल्याने अद्याप शिवसेनेकडे बहुमत आहेत.

भाजप ही सत्तेत भागीदार असली तरी त्यांचे वर्तन सत्तेला विरोधाचे राहिले आहे. भाजपकडे ३७ नगरसेवक असल्याने भाजप हा महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचा अंतर्गत विरोध पाहता महापौरपद शिवसेनेकडे असले तरी आता पक्षाकडे केवळ काठावरचे बहुमत उरल्याने आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Political News
BMC Warning: वडाच्या फांद्या कापाल, तर जेलची हवा खाल; महानगरपालिकेचा मुंबईकरांना इशारा

भ्रष्टाचारावर भ्र न काढणाऱ्या आयुक्तांचा 24 तासात निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेची जुळवून घेईल अंतर्गत कुरघोडी करणार नाही असा अलिखित करार झालेला आहे. असे असले तरीही भाजप उल्हासनगरची सत्ता हस्तगत करण्यासाठी वारंवार आपल्या नगरसेवकांमार्फत याचिका दाखल करून शिवसेनेच्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करत असल्याचे दिसून येत आहे.

पूजा भोईर यांच्या प्रकरणात अवघ्या 24 तासात आयुक्तांनी घेतलेला निर्णय म्हणजे भाजप नेत्यांनी दिलेला आदेश असल्याची चर्चा शहरात आहे. शहरात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे प्रलंबित आहे. त्या तक्रारींवर ही 24 तासात निर्णय झाला पाहिजे अशी मागणी तक्रारदारांची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news